नारायणगाव बसस्थानक समस्यांचे आगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 02:21 AM2017-08-11T02:21:49+5:302017-08-11T02:21:49+5:30

नारायणगाव हे आगार असतानादेखील येथील एसटी़ बसस्थानकाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे़ बसस्थानकात ठिकठिकाणी गळती सुरू आहे. या गळतीमुळे नारायणगाव बसस्थानक हे जीर्ण बसस्थानक झाले आहे़ या बसस्थानकातील बांधकामाच्या कॉलमलादेखील तडे गेलेले आहेत.

 Probation of Narayangaon bus station | नारायणगाव बसस्थानक समस्यांचे आगार

नारायणगाव बसस्थानक समस्यांचे आगार

Next

- सचिन कांकरिया 
नारायणगाव : नारायणगाव हे आगार असतानादेखील येथील एसटी़ बसस्थानकाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे़ बसस्थानकात ठिकठिकाणी गळती सुरू आहे. या गळतीमुळे नारायणगाव बसस्थानक हे जीर्ण बसस्थानक झाले आहे़ या बसस्थानकातील बांधकामाच्या कॉलमलादेखील तडे गेलेले आहे़ या बसस्थानकाची त्वरित दुरुस्ती अथवा नवीन बांधकाम न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते़ येथील बसस्थानकात येणारा प्रवासी बसस्थानकाची दयनीय अवस्था पाहून बसस्थानकात न थांबता बाहेर थांबणेच पसंत करीत आहे़
पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव एसटी बसस्थानक हे प्रमुख व महत्वाचा थांबा समजला जातो़ नाशिक ते पुणे दरम्यान संगमनेरनंतर नारायणगाव हेच बसस्थानक अनेक बसेससाठी थांबा आहे़
हे बस स्थानक सन १९४१-४२ मध्ये सुरू झालेले हे बसस्थानक ब्रिटिशकालिन बसस्थानक आहे. आज या बसस्थानकाची दुरवस्था झालेली आहे़
या बसस्थानकामध्ये विविध राज्यातील एसटी बस या ठिकाणी येतात. यामध्ये गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यांमधील बसेस या ठिकाणी येतात़ तर बसस्थानकामध्ये दररोज ३५० बस ये-जा करतात़ जुन्नर तालुक्यासह आंबेगाव तालुक्यातील अर्धा भाग नारायणगाव आगाराशी जोडला गेलेला आहे़ आंबेगाव तालुक्यात २२६ बसेस या ठिकाणाहून ये-जा करतात़
पुणे-नाशिककडे जाणाºया विनावाहक, निमआराम बसेस तसेच शिवनेरी या वातानुकूलित बसदेखील या ठिकाणी ये-जा करतात़ त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची २४ तास वर्दळ असते़
नारायणगाव हे आगार असताना देखील येथील बसस्थानक जीर्ण अवस्थेत होऊनदेखील कोणीही याबाबत दखल घेत नाही़ या बसस्थानकातील पुढील भाग खाजगी व्यक्तींनी फलक तयार केल्याने चांगला वाटतो़ परंतु आतमध्ये गेल्यानंतर प्रवासी या ठिकाणी बसण्यासदेखील तयार होत नाहीत़ बसस्थानकात ठिकठिकाणी गळती आहे़
रंगकाम कधी केले होते का? हे सांगणे अवघड आहे़ छतास अनेक भागांत पाझर येऊन गळती सुरू झाली आहे़ पावसाळ्यात प्रवाशांच्या अंगावर पाणी गळत असते़
बसस्थानकामध्ये बाहेरगावाहून आलेल्या चालक-वाहकांसाठी बसण्याची किंवा राहण्याची योग्य अशी व्यवस्था नाही़ प्रवाशी बसस्थानकामध्ये वाहने लावून बाहेर निघून जातात. यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही़
नारायणगाव बसस्थानक अद्ययावत होणार की नाही? असा प्रश्न सर्वच प्रवाशांना पडत आहे. जर जीर्ण झालेले बसस्थानक लवकरात लवकर नव्याने बांधले गेले नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना होऊ शकते़

एस़ टी़ बसचे आॅफीस, कंट्रोल रूम याची दुरवस्था झालेली आहे. कॉलम बिमला तडे जाण्यास सुरूवात झालेली आहे़ ठिकठिकाणी कचरा पडून अस्वच्छता निर्माण झालेली आहे़

प्रवाशांसाठी कोणतीही सुविधा नाही़ शौचालयालगत सर्व भाग दुर्गंधी युक्त झाला आहे़ ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे़ . एस़टी ़स्टॅन्डच्या मागील बाजूस दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या अवस्थेत आहेत़ तर रात्रीच्या वेळी अनेक मद्यपी आढळून येतात़

या एस ़टी स्थानकात मुंबई, पुणे, नगर, ठाणे, औरंगाबाद, बारामती येथील प्रवाशांसह अन्य भागातील प्रवाशी याठिकाणी येतात़ या प्रवाशांना बस स्थानकाची दुरवस्था व अस्वच्छता पाहील्यानंतर नारायणगाव हे मोठे शहर असूनही जीर्ण असे बस स्थानक पाहून आश्चर्य व्यक्त करतात़

नारायणगाव बसस्थानक हे जुने बसस्थानक आहे़ राज्य परिवहन विभागाचे विभागीय अभियंता कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी बसस्थानकाचा सर्वे करून मोजणी केलेली आहे़ पुन्हा एकदा मुख्य मोजणी होणार आहे. मात्र अद्याप झालेली नाही. नव्याने प्लॅन तयार करून नवीन बांधकामाचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे़
- महेश विटे, वाहतूक नियंत्रक, नारायणगाव बसस्थानक

Web Title:  Probation of Narayangaon bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.