शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळ्यातील पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण असणारे भुशी धरण 'ओव्हरफ्लो' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 21:11 IST

पर्यटन बंदीच्या आदेशामुळे धरणाच्या सांडव्यावर जाऊन पाण्याखाली भिजण्याला यावर्षी देखील मुकणार असल्याने पर्यटकांचा हिरमोड

लोणावळा : लोणावळा शहरातील पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण शुक्रवारी (दि. १८) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास 'ओव्हरफ्लो' झाले आहे. स्थानिक युवकांनी धरणाच्या सांडव्यावरील दोन मोर्‍यांची माती काढत धरणातील पाण्याला सांडव्यावरून वाहण्यासाठी वाट मोकळी करून दिली. मात्र पर्यटनबंदी आदेशामुळे पर्यटकांना धरणाच्या सांडव्यावर जाऊन भिजण्याचा आनंद यावर्षी देखील घेता येणार नाही अशी चिन्हे आहेत..

कोरोना महामारीमुळे मागील वर्षीपासून पर्यटनस्थळे बंद असल्याने भुशी धरण पर्यटकांना मुकले आहे. यावर्षी देखील अद्याप पर्यटनबंदी कायम असल्याने धरणावर जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. लोणावळा विभागाचे सहायक पोलीस अधिक्षक नवनीत काँवत म्हणाले,लोणावळा शहरात पर्यटकांना येण्यासाठी कोणतीही बंदी नाही.मात्र, त्यांना कोणत्याही पर्यटनस्थळांवर देखील जाता येणार नाही. 

महाराष्ट्र शासन व पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये अजूनही संचार व जमावबंदीचे आदेश तसेच पर्यटनस्थळे बंदचे आदेश लोणावळ्यात लागू आहे. पर्यटक लोणावळ्यात येऊ शकतात, हाॅटेल बंगले व फार्महाऊस येथे नियमांचे पालन करून राहू शकतात. मात्र त्यांना कोणत्याही पर्यटनस्थळांवर जाता येणार नाही. सर्व पर्यटनस्थळे बंद असून त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे.

 

लोणावळा शहर व मावळ तालुक्यातील गुरुवार पासून जोरदार पाऊस सुरू असल्याने डोंगर भागातून मोठे मोठे धबधबे वाहू लागले आहेत. यामुळे आकाराने लहान असलेले भुशी धरण दोनच दिवसांत ओव्हरफ्लो झाले आहे. तसेच विविध भागातून धबधबे देखील वाहू लागले आहेत.

टॅग्स :lonavalaलोणावळाDamधरणRainपाऊसtourismपर्यटनPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या