शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार...! उद्योगनगरीला धोऽ..धो..धुतले,रस्ते गेले पाण्याखाली; वातावरणात गारठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 08:41 IST

- पवना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ;; चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिराच्या पायरीला लागले पाणी; नोकरदार आणि बाजारकरूंची तारांबळ, रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना पाण्यातून मार्ग काढणे कठीण

पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी (दि. २७) दिवसभर पावसाचा जोर कायम होता. सोमवार आणि मंगळवारच्या दमदार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पावसाने नोकरदार आणि कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांना ओलेचिंब करून टाकले. आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाने शहरवासीय गारठले आहेत. नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ होत आहे. पवन धरण क्षेत्रात पाऊस सुरू असून, पाणीसाठ्यात वाढ होत आहे. 

शहर आणि उपनगरांत मंगळवारी सकाळच्या सत्रात पावसाचा जोर काहीसा कमी असला, तरी दुपारनंतर तो पुन्हा वाढला. सायंकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच राहिली. यामुळे बाजारपेठा आणि मुख्य रस्त्यांवरील वर्दळ कमी दिसून आली. पावसामुळे अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले. जे नागरिक खरेदीसाठी किंवा फिरायला घराबाहेर पडले, त्यांना छत्र्या-रेनकोटचा आधार घ्यावा लागला. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना पाण्यातून मार्ग काढणे कठीण झाले होते. त्यामुळे शहरातील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती.तिन्ही नद्यांना पूर शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी नद्यांना पूर आला आहे. नद्यांच्या दोन्ही बाजूंच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिराच्या पायरीला पाणी लागले आहे.

रस्त्यांवर पाण्याचे लोंढेमंगळवारी दिवसभर शहरात, तसेच धरणक्षेत्रातही पावसाच्या सरी कोसळत होत्या. महापालिकेने ड्रेनेजची स्वच्छता केल्याचा दावा केला असला, तरी पावसाचा जोर जास्त असल्याने मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर पाण्याचे लोंढे वाहत होते. काही भागांत वाट न मिळाल्याने रस्त्यावर गुडघाभर उंचीचे पाणी साठले. त्यामुळे रस्त्यावरील तसेच काही ठिकाणी सोसायट्यांच्या पार्किंगमध्येही चारचाकी गाड्या पाण्यात होत्या.

महामार्गावर वाहतूक कोंडीपुणे- मुंबई महामार्गावर देहूरोड येथील सेंट्रल चौकामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. चाकरमान्यांच्या नावावर लेट मार्क पडत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. येथील खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

सूर्यदर्शन नाहीच; तापमानात मोठी घटपावसामुळे शहरातील तापमानात मोठी घट झाली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला चाळिशीपार गेलेले तापमान गेल्या आठवड्यात जवळपास दहा अंशांनी घसरले. मंगळवारी चिंचवड येथे कमाल तापमान २४.१, तर किमान तापमान २२.६ अंश नोंदविण्यात आले. गेल्या बुधवार (दि. २१) पासून सूर्यदर्शन झालेले नाही.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेRainपाऊस