तूर ग्रामपंचायत मतदान केंद्र तयारी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:26 IST2021-01-13T04:26:37+5:302021-01-13T04:26:37+5:30
जुन्नर तालुक्यातील ज्या मोठ्या ग्रामपंचायती आहेत त्यात १७ सदस्य असलेल्या ओतूर ग्रामपंचायत चा समावेश आहे .दि.१५ जानेवारी रोजी ओतूर ...

तूर ग्रामपंचायत मतदान केंद्र तयारी पूर्ण
जुन्नर तालुक्यातील ज्या मोठ्या ग्रामपंचायती आहेत त्यात १७ सदस्य असलेल्या ओतूर ग्रामपंचायत चा समावेश आहे .दि.१५ जानेवारी रोजी ओतूर ग्रामपंचायत ची निवडणूक होत आहे त्या निवडणुकीसाठी लागणार्या मतदान केंद्राची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती ओतूरचे मंडलाधिकारी डी.एस.लवांडे यांनी दिली .
ओतूर ग्रामपंचायत निवडणूक २०२१ ते २०२५ या कालखंडासाठी ग्रामपंचायत सदस्य मतदानाने मतदारांनी निवडून द्यायचे आहेत .ओतूर ग्रामपंचायतीचे ६ वार्ड आहेत .या ६ वार्डातून १७ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत .
या निवडणुकी साठी १४ हजार २५७ स्त्री ,पुरुष मतदार आहेत .मतदारांना मतदान करण्यासाठी वार्ड निहाय मतदान केंद्र व्यवस्था करण्यात आली आहे . १) चैतन्य विद्यालय महालक्ष्मी मैदान इमारत .-- या मतदान केंद्रात वार्ड निहाय तीन मतदान केंद्र आहेत या मतदान केंद्रात वार्ड नं २ वार्ड नं ५ व ६अशी तीन केंद्र आहेत .मतदारांनी वार्ड क्रमांक पाहून मतदान करावे .
मतदान केंद्र ---जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं १
मुलांची ---या ठिकाणी वार्ड नं१ व वार्ड नं ३मधील मतदारांनी तेथील दोन केंद्रात वार्डानुसार मतदान करावे ३) जि.प.प्राथमिक शाळा नं २ मुलींची . या ठिकाणी एकच मतदान केंद्र आहे .वार्ड नं ४ मधील मतदाराना मतदान करता येईल.
मतदान केंद्रावर येतात मास्क लावूनच यावे सोशल डिस्टंटचे पालन करणे आवश्यक आहे .असे कामगार तलाठी आर आर पंधारे संदीप राऊत यांनी सांगितले