इंदोरीजवळ ट्रक उलटला

By Admin | Updated: May 12, 2014 04:00 IST2014-05-12T04:00:57+5:302014-05-12T04:00:57+5:30

तळेगाव-चाकण रस्त्यावर इंदोरीजवळ श्रीक्षेत्र डोंगराच्या पायथ्याशी भुशाने भरलेला ट्रक उलटून चालक गंभीर, तर क्लीनर किरकोळ जखमी झाले आहेत.

Took the truck near Indore | इंदोरीजवळ ट्रक उलटला

इंदोरीजवळ ट्रक उलटला

तळेगाव स्टेशन : तळेगाव-चाकण रस्त्यावर इंदोरीजवळ श्रीक्षेत्र डोंगराच्या पायथ्याशी भुशाने भरलेला ट्रक उलटून चालक गंभीर, तर क्लीनर किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि. ११) पहाटे तीनच्या सुमारास घडली. चाकणकडून तळेगावकडे हा ट्रक (एमएच ४६ एफ २३०९) चालला होता. ट्रकचे मालक शांताराम गलबे हेच ट्रक चालवत होते व हनुमंत भास्कर गलबे (वय १९, दोघेही रा. नागोठणा, ता. रोहा, जि. रायगड) शेजारी बसले होते. सणसवाडी (ता. शिरूर) येथून गव्हाचा भुसा भरून ट्रक पाली (जि. रायगड) येथे चालला होता. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ट्रक उलटून रस्त्याच्या खाली कोसळला. क्लीनर हनुमंत कसाबसा बाहेर पडू शकला, पण चालक केबिनखाली अडकल्याने बाहेर पडू शकले नाही. इंदोरीचे कमलाकर म्हस्के व गुरुसिंग यांनी दोन तासांच्या प्रयत्नानंतर शांताराम गलबे यांना बाहेर काढले. सोमाटणे फाट्यावरील खासगी रुग्णालयामध्ये ते उपचार घेत आहेत. गलबे यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Took the truck near Indore