शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शिवशाही बसच्या पाठीमागचे अपघाताचे शुक्लकाष्ट संपेना; दैव बलवत्तर म्हणून १२ प्रवासी बचावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 19:17 IST

पुणे-नाशिक महामार्गावर कळंब गावच्या हद्दीत रात्री शिवशाही बस झाली पलटी

ठळक मुद्देशिवशाही बसला यापूर्वी अनेकवेळा अपघात

मंचर: पुणे-नाशिक महामार्गावर कळंब गावच्या हद्दीत रात्री शिवशाही बस पलटी झाली.सुदैवाने या अपघातातून 12 प्रवासी बालंबाल बचावले असून काळ आला होता पण वेळ आली नव्हती याची प्रचिती यानिमित्ताने आली .बसमधील दोन प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे.अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.लॉकडाउननंतर शासनाने एसटी सेवा हळूहळू सुरू केली असून नुकतीच शिवशाही बस सेवा सुरू झाली आहे. शिवशाही बसचे यापूर्वी अनेक वेळा अपघात झाले आहेत. मात्र एसटी सेवा सुरु झाल्यानंतरचा हा पहिला अपघात कळंब गावच्या हद्दीत झाला .सुदैवाने यात प्रवासी बालंबाल बचावले आहेत.पुणे - नाशिक  महामार्गावर कळंब गावच्या हद्दीत रात्री साडेआठ वाजता नाशिक ते पुणे शिवशाही बस पलटी झाली. शिवशाही बस क्रमांक ( एम.एच.०६ बी.डब्लू. ०६४१) नाशिकवरून पुण्याच्या दिशेने जात होती. कळंब गावच्या हद्दीत समोरून अचानक येणाऱ्या एका चारचाकी वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात शिवशाही बस रस्ता उतरून डाव्या बाजूला रस्त्यावर पलटी झाली. बसमध्ये १२ प्रवासी होते. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. अपघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.         उद्योजक नितीन भालेराव व अन्य ग्रामस्थ मदतीसाठी धावले. उपस्थित ग्रामस्थांनी प्रवाशांना बाहेर काढले. महेश थोरात यांनी तात्काळ आपला जेसीबी आणून जेसीबीच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस रस्त्यातून बाजुला काढली. त्यानंतर वाहतुक पुर्ववत सुरू झाली. बारा प्रवाशांपैकी दोन प्रवाशांना किरकोळ मार लागला होता. उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उर्वरित प्रवाशांना थोडासा मार लागल्याने ग्रामस्थांच्या मदतीने त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातानंतर पुणे-नाशिक महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली. शिवशाही बस पलटी झाल्यानंतर  प्रवाशाला अथवा चालकाला गंभीर  दुखापत झाली नसल्याने काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय आला आहे.

टॅग्स :MancharमंचरShivshahiशिवशाहीST Strikeएसटी संपAccidentअपघात