शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसात सहाव्या दिवशीही टोलबंद आंदोलन सुरूच

By admin | Updated: March 2, 2015 01:11 IST

शिक्रापूर-चाकण टोलवसुली व प्रकल्पाबाबतची अनेक कागदपत्रे मागूनही मिळत नाहीत, टोल बंद करण्यासाठी आंदोलनाची दिशा तीव्र केली जाईल,

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण टोलवसुली व प्रकल्पाबाबतची अनेक कागदपत्रे मागूनही मिळत नाहीत, टोल बंद करण्यासाठी आंदोलनाची दिशा तीव्र केली जाईल, याबाबतचे निवेदन संबंधित खात्याच्या मंत्र्यांना देण्यात आले असल्याची माहिती क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी दिली. मंगळवारपासून सुरू झालेल्या या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी टोलवसुली बंद करण्यात आली होती. अचानक गुरुवारी रात्री पुन्हा टोलवसुली सुरू करण्यात आली. गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलकांनी केलेल्या प्रयत्नाला अपयश आले असले, तरी आता हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. ५ कोटी ५० लाख रुपयांच्या प्रकल्पाची किंमत १० कोटी २८ लाख रु. का केली, प्रकल्प इस्टिमेट, नकाशे, कामाचे तपासणी रिपोर्ट, थेट सुधारणा अंतर्गत काम केल्याबाबतची कागदपत्रे (९८-९९), नूतनीकरण केलेल्या कामाची कागदपत्रे, वाढीव कामाचे अंदाजपत्रक (सविस्तर) व संबंधित कागदपत्रे, सहायक अभियंता, उप-अभियंता यांचे काम चालू झाल्यापासून आजपर्यंतचा अहवाल, टिपण्या, वाढीव काम व त्यासंबंधात झालेला पत्रव्यवहार, तात्पुरते काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्राबरोबर अपूर्ण कामाबाबतचे अहवाल, १० कोटींसाठी परतावा किती द्यायचा याची माहिती, वाढीव कामाच्या किमतीच्या मोबदल्यात उद्योजकाला द्यावयाची एकूण रक्कम, उद्योजकाने टोलबूथवर लावलेल्या सी.सी.टीव्हीच्या हार्ड डिक्स, उद्योजकाला दरदिवशी मिळणारी टोलवसुलीची रक्कम, आजपर्यंत उद्योजकाला मिळालेली एकूण रक्कम, उद्योजकाने स्वत:ची किती रक्कम गुंतविली, त्यावर व्याज किती व नफा किती, प्रकल्पावर अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता यांच्या भेटीची दैनंदिनी, प्रकल्प किमतीला व वाढीव सवलत कालावधीला अर्थमंत्रालयाची मंजुरी, टीका टिपण्णी, पायाभूत समितीची मान्यता, गौणखनिज रॉयल्टी, आदी प्रमुख मागण्यांची पूर्तता संबंधितांनी करून टोलनाका बंद करण्याची मागणी पाचंगे व आंदोलकांनी केली. गेली सहा दिवस शांततेच्या मार्गाने सुरू असलेले टोल बंद आंदोलन उग्ररूप घेण्याच्या मार्गावर आहे. याबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. याबाबत शिरूरचे आमदार बाबूराव पाचार्णे यांनी आंदोलकांची भेट घेऊन बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा घडवून आणणार असल्याचे सांगितले.