राष्ट्रवादीला साथ विकासाला साथ

By Admin | Updated: October 2, 2014 00:11 IST2014-10-02T00:11:02+5:302014-10-02T00:11:02+5:30

पुण्यातील मेट्रोसह सर्वच विकासात्मक कामांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका सकारात्मक आहे.

Together with the development of NCP | राष्ट्रवादीला साथ विकासाला साथ

राष्ट्रवादीला साथ विकासाला साथ

पुणो : पुण्यातील मेट्रोसह सर्वच विकासात्मक कामांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका सकारात्मक आहे. त्यामुळे येणा:या 15 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानादिवशी राष्ट्रवादी काँग्रेसलाच मतदान करा. राष्ट्रवादीला साथ म्हणजे विकासाला साथ, असे मत शिवाजीनगर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल भोसले यांनी आज व्यक्त केले. 
शिवाजीनगर मतदारसंघातील पुलाचीवाडी, डेक्कन जिमखाना परिसरात काढलेल्या पदयात्रेदरम्यान अनिल भोसले यांनी नागरिकांशी थेट संपर्क साधला. याप्रसंगी अंकुश काकडे, नगरसेवक बाळासाहेब बोडके, उदय महाले, श्रीकांत पाटील, रवी चौधरी, शंकर भोरडे, नीलेश कदम, कृष्णकांत कुदळे, माधव भिडे, शैलेश बदडे, बाळा दारवटकर, योगेश मोरे, अजय दुधाने, सोमनाथ बोरकर, दीपराज चव्हाण, सुकेश पासलकर, गणोश गंगावणो, अनिल पायगुडे, प्रणाली सोनवणो आदी मान्यवर आणि कार्यकर्ते मोठय़ा संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते. शिरोळेवस्ती, आपटे रस्ता, पुलाची वाडी, डेक्कन जिमखाना परिसरात पदयात्र काढण्यात आली. 
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा परिसर हा पुणो शहराचा महत्त्वपूर्ण भाग समजला जातो. त्या दृष्टिकोनातून या परिसराचा विकास होणो अपेक्षित आहे. परंतु, आजर्पयत येथील प्रश्न, समस्या आणि विकासासंदर्भात राज्य सरकारकडे विधानसभेच्या माध्यमातून योग्य तो पाठपुरावा झालेला नसल्याने या मतदारसंघाचा अपेक्षित विकास होऊ शकलेला नाही. हा विकास फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होऊ शकतो. शिवाजीनगर मतदारसंघाचा सर्वागीण विकास साधण्यासाठी विधानसभेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे निर्णायकी पाठपुरावा करण्यासाठी मतदारांनी मला संधी द्यावी, असे आवाहन अनिल भोसले यांनी या वेळी केले.  (प्रतिनिधी)

 

Web Title: Together with the development of NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.