शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

आजच्या विद्यार्थ्यांचा झालाय संभ्रमित अर्जुन - नंदकुमार सागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 02:36 IST

महाभारतामध्ये अर्जुन ज्या पद्धतीने गलितगात्र झाला होता. माझ्या समोरील सर्व नातेवाईक माझे आहेत, मी त्यांना कसे मारू, कशासाठी मारू, त्यांना मारून काय साध्य होणार, असे नाना प्रश्न त्याला पडले होते. आजचा विद्यार्थी हा असाच झाला आहे.

महाभारतामध्ये अर्जुन ज्या पद्धतीने गलितगात्र झाला होता. माझ्या समोरील सर्व नातेवाईक माझे आहेत, मी त्यांना कसे मारू, कशासाठी मारू, त्यांना मारून काय साध्य होणार, असे नाना प्रश्न त्याला पडले होते. आजचा विद्यार्थी हा असाच झाला आहे. कोणत्या साईडला प्रवेश घेऊ, कोणता क्लास लावू, करिअरचे काय, असे प्रश्न त्याच्या समोर आहेत. आपल्याला आपला विद्यार्थी परीक्षार्थी न होता तो संस्कारक्षम गुणवंत होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आज आपण आपल्या सभोवताली पाहातो आहोत शिक्षणाचे बाजारीकरण होत आहे, असे मत राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले प्राचार्य नंदकुमार सागर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.ते म्हणाले, अनेकदा उच्च शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया निम्मे वर्ष संपले तरी पूर्ण होत नाही. आजच्या शिक्षण क्षेत्रात नवीन नवीन बदल घडत आहेत ते समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्व भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून शिक्षण पद्धती हवी. त्यामुळे त्यांच्या रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असणाºया विषयाची शिक्षण पद्धती निर्माण करावी. कारण, भविष्यात त्यांना त्यांचे करिअर घडविण्यासाठी मदत होईल.भारताचे माजी राष्ट्रपती स्वर्गीय अब्दुल कलाम यांनी ‘भारत हा महासत्ता व्हायचा असेल तर जास्तीत जास्त युवक हा सुशिक्षित होणे गरजेचे आहे’, असे विधान केले होते. सुशिक्षित म्हणजे शिक्षण परीक्षा पद्धतीत अडकून राहण्यापेक्षा त्यांच्या मानसिकतेचा विचार करून कृतियुक्त शिक्षणावर भर दिला पाहिजे. केवळ पुस्तकी शिक्षण न देता ज्ञानरचनावादावर शिक्षण पद्धती अवलंबून असावी. अध्ययन-अध्यापन, संशोधन व समाज विस्तार हे खरे शिक्षणाचे मूळ असणे महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या परिस्थितीचे संशोधन करून आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, दारिद्र्य नष्ट करण्यासाठीचे प्रयोजन असणे गरजेचे आहे.केवळ नोकरदार निर्माण करण्यापेक्षा सामाजिक भान ठेवून उद्योजक निर्माण करणारे भारताचे आदर्श नागरिक शाळा-शाळांमधून घडविण्याचे कार्य होणे गरजेचे आहे. गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी अथक परिश्रमाची गरज असते. तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर स्वत:ची नैतिक मूल्ये मजबूत करून समाजामध्ये आपले असामान्य कर्तृत्व निर्माण करणारी शिक्षण पद्धती असावी.जिजामाता हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, जेजुरी या विद्यालयात मी २४ वर्षे मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे. शालेय प्रशासन करताना मुख्याध्यापकाजवळ भाषणकौशल्य, वक्तृत्व कौशल्य व अध्यापन कौशल्य हे व्यक्तिगत गुण असणे आवश्यक आहे. शालेय प्रशासन व अध्ययन-अध्यापन या प्रकियेत विद्यार्थी हा केंद्रस्थानी असतो. माझाही शिक्षक म्हणून कायम हाच प्रयत्न राहिलेला आहे.मी स्वत: वर्ग व विषय अध्यापन करत असून माझ्या विषयाचा दहावी बोर्ड परीक्षेत कायम १०० टक्के निकाल लागला आहे. अध्ययन, अध्यापन व उपक्रमांद्वारे कृतीसंशोधनाचे काम करीत आहे.शालेय शैक्षणिक कामाचे वार्षिक नियोजन, वर्गवार विषयवार वेळापत्रके, बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक कार्यक्रमांचे नियोजन, अभ्यासात मागे असणाºया विद्यार्थ्यांसाठी सुधारात्मक उपक्रम राबवीत असतो. तसेच विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक विकासाकडे लक्ष देतो.आपल्या देशाची संस्कृती व परंपरा यांना ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. संस्कृतीबरोबरच गुरू परंपरेला फार मोठा इतिहास आहे. पूर्वीची शिक्षणपद्धती आश्रम शिक्षणपद्धती होती. या शिक्षणपद्धतीमध्ये काळानुसारबदल होत गेला आणि निर्माणझाली एक शिक्षणपद्धती. यामध्ये फक्त मुले ज्ञानार्जन घेत होती. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या त्यागाने, प्रयत्नाने मुलींना शिक्षणाचा हक्क प्राप्त झाला आणि खºया अर्थाने शिक्षणव्यवस्था सुरू झाली.जवळपास २०व्या शतकामध्ये गुरू आणि शिष्य यांचे एक अतूट असे नाते निर्माण झाले. अतिशय मनमोकळे शिक्षण, शिस्तबद्धता, कडक परीक्षा पद्धती यामुळे शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये संवाद होत होता. आज ही शिक्षणपद्धती बदललेली जाणवते.संवादाचे आधुनिक असे अनेक पर्याय विद्यार्थ्यांसमोर आहेत. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये संवादाचा अभाव जाणवतो. यासाठी सुसंवाद वाढवणारी व सुजाण नागरिक घडवणारी शिक्षणपद्धती आता गरजेची आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी