आजची विज्ञानकथा उद्याचे तंत्रज्ञान
By Admin | Updated: March 29, 2017 02:35 IST2017-03-29T02:35:10+5:302017-03-29T02:35:10+5:30
कालची विज्ञानकथा आजचे विज्ञान व उद्याचे तंत्रज्ञान असणार आहे असे मत व्यक्त करीत, चंद्र, मंगळ ग्रह यांवर मानवी प्रस्थापितेच्या

आजची विज्ञानकथा उद्याचे तंत्रज्ञान
पुणे : कालची विज्ञानकथा आजचे विज्ञान व उद्याचे तंत्रज्ञान असणार आहे असे मत व्यक्त करीत, चंद्र, मंगळ ग्रह यांवर मानवी प्रस्थापितेच्या कल्पना येऊ घातल्या आहेत, असे पुण्याच्या विज्ञान भारतीचे अध्यक्ष सुरेश नाईक म्हणाले. मनाक्षरे पब्लिकेशन्सच्या राजे देशमुखलिखित शिकारनामा तसेच आश्लेषा महाजन यांनी अनुवादित केलेल्या श्रीनिवास शारंगपाणी यांच्या अतिदूरचे बांधव या पुस्तकांचे प्रकाशन पत्रकार भवन येथे झाले, त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दीपक टिळक, डॉ. संदीप जयपूरकर, पूजा पांडे, देवदास पेशवे आदी मान्यवर उपस्थित होते. मनोगतात नाईक म्हणाले, ‘‘अवकाशविज्ञान झपाट्याने पुढे जात आहे. विज्ञानकथांमधून अनेकांना प्रेरणा मिळत असते. त्यामुळे विज्ञान कथांचा अनुवाद करणे गरजेचे आहे.’’
दीपक टिळक मनोगतात म्हणाले, ‘‘वडील शिकारी करीत असल्याने वडिलांसोबत अनेक जंगलांमध्ये फिरता आले. आज शिकारीला बंदी असली तरी त्या काळी ते शौर्य समजलं जात असे. वन्यजीव ओळखावं कसं, तसेच ते कसे पाहायला हवे, हे शिकारनामा या पुस्तकातून सांगण्यात आले आहे.
(प्रतिनिधी)