शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्याच्या निधनामुळे पुणे विद्यापीठातील एम. काॅमचे अाजचे पेपर रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 14:20 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने, अाज विद्यापीठाच्या वाणिज्य विभागात हाेणारे एम काॅमचे दाेन पेपर पुढे ढकलण्यात अाले अाहेत.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात राहणारा ऋषिकेश अाहेर याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ऋषिकेश हा विद्यापीठाच्या वाणिज्य विभागात दुसऱ्या सत्रात शिकत हाेता. अाजच त्याचा दुसऱ्या सत्रातील पहिला पेपर हाेता. ऋषिकेशच्या अचानाक जाण्याने विद्यार्थ्यांना धक्का बसला असून विद्यार्थ्यांनी एम काॅमचे अाज हाेणारे दाेन पेपर पुढे ढकलण्याची विनंती केली हाेती. कुलगुरुंनी विद्यार्थ्यांची विनंती मान्य करत अाज हाेणारे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे एम काॅमचे दाेन्ही पेपर पुढे ढकलले अाहेत.     सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहात राहणाऱ्या ऋषिकेश अाहेर याचे सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अाज सकाळी साडेसहाच्या सुमारास ऋषिकेशला त्रास हाेऊ लागला. ताे अाेरडायला लागल्याने शेजारील विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे धाव घेत सुरक्षा रक्षकांना बाेलावून घेतले. त्यानंतर त्याला विद्यापीठातील अाराेग्य केंद्रात हलविण्यात अाले. परंतु त्याची तब्येत जास्त खालवली असल्याने त्याला ससून रुग्णालयात हलविण्यात अाले. ससूनला त्याला उपचारादरम्यान मृत घाेषित करण्यात अाले. ऋषिकेश हा मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याचा रहिवासी अाहे. दरम्यान अाज एम काॅमचे दाेन पेपेर हाेणार हाेते. ऋषिकेशच्या अचानक जाण्याने विद्यार्थ्यांना माेठा धक्का बसला हाेता. त्यांनी अाजचे पेपर पुढे ढकलण्याची विनंती केली हाेती. त्यानुसार कुलगुरुंनी अाजचे दाेन्ही पेपर पुढे ढकलले अाहेत. अाजचे पेपर परीक्षा संपल्यावर घेण्यात येणार असून, त्याबाबतची अधिकृत माहिती नंतर देण्यात येईल असे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात अाले अाहे. 

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठexamपरीक्षाStudentविद्यार्थीDeathमृत्यू