आज केवळ कोव्हॅक्सिन लस उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:14 IST2021-09-06T04:14:35+5:302021-09-06T04:14:35+5:30

पुणे : पुणे महापालिकेला शासनाकडून नव्याने कोव्हिशिल्ड लस प्राप्त न झाल्यामुळे, आज (सोमवार दि. ६) शहरात कोव्हिशिल्ड लस मिळणार ...

Today only the covacin vaccine is available | आज केवळ कोव्हॅक्सिन लस उपलब्ध

आज केवळ कोव्हॅक्सिन लस उपलब्ध

पुणे : पुणे महापालिकेला शासनाकडून नव्याने कोव्हिशिल्ड लस प्राप्त न झाल्यामुळे, आज (सोमवार दि. ६) शहरात कोव्हिशिल्ड लस मिळणार नाही.

मात्र ससून रुग्णालयासह महापालिकेच्या झोननिहाय ११ दवाखान्यात, महापालिकेतर्फे शिल्लक साठयातून प्रत्येकी १४० लसीचे डोस महापालिकेकडून वितरित करण्यात आले आहेत.

लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना १५ टक्के लस ही आॅनलाईन बुकिंगव्दारे, तर १५ टक्के लस ही आॅन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे. तर कोव्हॅक्सिन लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ३५ टक्के लस ही २८ दिवस पूर्ण झालेल्यांना ( ९ ऑगस्ट पूर्वी लस घेतलेल्यांना) आॅनलाईन बुकिंगव्दारे तर ३५ टक्के लस ही आॅन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे.

लसीकरणाच्या आॅनलाईन बुकिंग करिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.

--------------------

Web Title: Today only the covacin vaccine is available