आज केवळ कोव्हॅक्सिन लस उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:20 IST2021-09-02T04:20:24+5:302021-09-02T04:20:24+5:30

पुणे : महापालिकेच्या कुठल्याही लसीकरण केंद्रावर आज (दि.१ सप्टेंबर) कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार नाही़ केवळ ससून रुग्णालयासह महापालिकेच्या ...

Today only the covacin vaccine is available | आज केवळ कोव्हॅक्सिन लस उपलब्ध

आज केवळ कोव्हॅक्सिन लस उपलब्ध

पुणे : महापालिकेच्या कुठल्याही लसीकरण केंद्रावर आज (दि.१ सप्टेंबर) कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार नाही़ केवळ ससून रुग्णालयासह महापालिकेच्या ११ दवाखान्यांमध्ये आज कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आहे़

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, या ११ दवाखान्यांमध्ये प्रत्येकी ३५० लसीचे डोस पुरविण्यात आले आहेत़ ज्यांनी कोव्हॅक्सिन लसीचा २८ दिवसांपूर्वी (४ जुलैपूर्वी लस घेतलेल्यांना) पहिला डोस घेतला आहे. त्यांना आॅनलाईन बुकिंगद्वारे व आॅन दी स्पॉट नोंदणीद्वारे प्रत्येकी ३५ टक्के लस दुसरा डोस म्हणून मिळणार आहे. तर १५ टक्के लस ही आॅनलाईन बुकिंग व १५ टक्के लस आॅन दी स्पॉट नोंदणीद्वारे पहिला डोस म्हणून मिळणार आहे़ लसीकरणाच्या आॅनलाईन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.

Web Title: Today only the covacin vaccine is available