आज ‘लोकमत’ पूर्व पुणे कार्यालयाचा वर्धापन दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:13 IST2017-08-18T01:13:15+5:302017-08-18T01:13:18+5:30

‘लोकमत’ पूर्व पुणे कार्यालयाच्या सहाव्या वर्धापनदिना-निमित्त शुक्रवारी (१८ आॅगस्ट) हडपसर येथील लोकमत कार्यालयात स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला

Today 'Lokmat' anniversary day of East Pune office | आज ‘लोकमत’ पूर्व पुणे कार्यालयाचा वर्धापन दिन

आज ‘लोकमत’ पूर्व पुणे कार्यालयाचा वर्धापन दिन

पुणे : ‘लोकमत’ पूर्व पुणे कार्यालयाच्या सहाव्या वर्धापनदिना-निमित्त शुक्रवारी (१८ आॅगस्ट) हडपसर येथील लोकमत कार्यालयात स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ६ ते ८ या वेळेत हा सोहळा रंगणार आहे.
पूर्व पुण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने के- १४, मेगा सेंटर, पुणे -सोलापूर रस्ता, हडपसर, पुणे-४११०२८ येथे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. वाचकांच्या विश्वासाच्या बळावर ‘लोकमत’ पूर्व कार्यालयाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. येत्या शुक्रवारी लोकमत पूर्व पुणे कार्यालयाचा वर्धापन दिन साजरा केला जात आहे.
या स्नेहमेळाव्यात उपस्थित राहून ऋणानुबंधांच्या गाठी आणखी दृढ कराव्यात, असे आवाहन ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर व वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई यांनी केले आहे.

Web Title: Today 'Lokmat' anniversary day of East Pune office