अकरावी प्रवेशासाठी आज मार्गदर्शन वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 03:25 AM2018-06-13T03:25:18+5:302018-06-13T03:25:18+5:30

अकरावी प्रवेशाचा आॅनलाईन अर्ज भरणे व त्यासंबंधित माहिती देण्यासाठी बुधवारी (दि. १३) शहरात विभागनिहाय ७ ठिकाणी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

Today guidance section for admission | अकरावी प्रवेशासाठी आज मार्गदर्शन वर्ग

अकरावी प्रवेशासाठी आज मार्गदर्शन वर्ग

googlenewsNext

पुणे : अकरावी प्रवेशाचा आॅनलाईन अर्ज भरणे व त्यासंबंधित माहिती देण्यासाठी बुधवारी (दि. १३) शहरात विभागनिहाय ७ ठिकाणी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
गरवारे कॉलेज, कलमाडी हायस्कूल (एरंडवणे), पटर्वधन विद्यालय (दांडेकर पूल), आझम कॅम्पस (कॅम्प), साधना विद्यालय (हडपसर), मॉडर्न महाविद्यालय (शिवाजीनगर), म्हाळसाकांत महाविद्यालय (आकुर्डी) येथे यांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य मंडळाचा (एसएससी) दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेशप्रक्रियेला वेग आला आहे. केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीमार्फत उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशाची प्रक्रिया राबविली जात आहे. याबाबत पालकांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरात १३ जून रोजी एकाच दिवशी वेगवेगळ्या विभागांत याचे आयोजन करण्यात आले आहे. गरवारे महाविद्यालयात ११ ते १ या वेळेत, कलमाडी विद्यालयात २ ते ४ या वेळेत, पटवर्धन विद्यालयात १ ते २ या वेळेत, आझम कॅम्पसमध्ये दुपारी ३ ते ४ या वेळेत, साधना विद्यालयात ११ ते १ या वेळेत, मॉडर्न महाविद्यालयात दुपारी ३ ते ४ या वेळेत, म्हाळसाकांत महाविद्यालयात ११ ते १ या वेळेत हे मार्गदर्शन वर्ग आयोजित केले आहेत.
अकरावी प्रवेश अर्जाचा भाग १ भरण्यास दि. १४ मे २०१८ पासून सुरुवात झाली. आतापर्यंत ७३ हजार ९२५ विद्यार्थ्यांचे अर्ज आॅनलाईन भरले गेले आहेत. त्यांपैकी १७ हजार ६५३ अर्जांची पडताळणी झालेली नाही. ज्यांनी आतापर्यंत अर्जाचा पहिला भाग भरलेला नाही, त्यांना अर्जाचा भाग १ व भाग २ एकाच वेळी
भरता येणार आहे. यासाठी २५ जूनपर्यंत अखेरची मुदत देण्यात आलेली आहे. प्रवेशप्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतून माहितीपुस्तिका विकत घ्यायची आहे.
या पुस्तिकेत लॉगइन आयडी व पासवर्ड देण्यात आला आहे. त्याआधारे लॉगइन करून त्यांनी अर्जाचा पहिला भाग भरला आहे. यामध्ये वैयक्तिक माहितीसह आरक्षण, कोटा ही माहिती नमूद करण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना दुसºया भागात त्यांच्या गुणांची माहिती भरावी लागेल.

Web Title: Today guidance section for admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.