‘स्वच्छता दूतां’च्या हस्ते आज ध्वजारोहण
By Admin | Updated: January 26, 2017 00:57 IST2017-01-26T00:57:24+5:302017-01-26T00:57:24+5:30
‘ते’ नसते तर शहरातील कचराकुंड्या ओसंडून वाहत असत्या... सर्वत्र रोगाचे साम्राज्य पसरले असते. हे ‘स्वच्छता दूत’ नसते तर समाजाची अवस्था काय झाली असती

‘स्वच्छता दूतां’च्या हस्ते आज ध्वजारोहण
पुणे : ‘ते’ नसते तर शहरातील कचराकुंड्या ओसंडून वाहत असत्या... सर्वत्र रोगाचे साम्राज्य पसरले असते. हे ‘स्वच्छता दूत’ नसते तर समाजाची अवस्था काय झाली असती याचा विचार न करणेच बरे! पण खरंच त्यांची दखल घेतो कोण? त्यांना ना पैसा हवाय, ना गाडी ना बंगला, त्यांना केवळ एक नजर हवी आहे, आपुलकीची. याच ‘स्वच्छता दूतां’ची दखल घेऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज (दि. २६) प्रजासत्ताकदिनी सफाई कामगारांच्या हस्ते तिरंगा फडकविला जाणार आहे.
वाकड येथील निसर्ग सिटी फेज १ सोसायटीने हे अभिनव पाऊल उचलून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
काम मग ते कुठलेही असो, कुणालाही कमी लेखता कामा नये. याच भावनेतून यंदा सफाई कामगारांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सोसायटीचे सचिव योगेश पितांबरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)