शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

'उषःकाल होता होता काळरात्र झाली...आज "सर्वात काळा दिवस"; सदाभाऊ खोतांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 13:41 IST

पुढे सदाभाऊ खोत म्हणतात, तीन कृषी कायदे मागे घेण्याची दुर्दैवी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. हा आघात शेतकऱ्यांना सहन होण्यापलिकडचा आहे. आता कोठे शेतकऱ्यांच्या अंधारलेल्या जीवनात प्रकाशाची चार किरणे पसरण्याची शक्यता तयार झाली होती. पण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि डाव्या पक्षांच्या अभद्र युतीने ही अंधुकशी शक्यताही हाणून पाडली (Farm Bills 2020, farmer protest)

पुणे: आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील वादग्रस्त तीन कृषी कायदे (agriculture bill) रद्द करत असल्याची घोषणा केली. मागील जवळपास एक वर्षापासून हे कायदे रद्द होण्यासाठी दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन (farmer protest against Farm Bills 2020) करत होते. हे कायदे रद्द झाल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी पंतप्रधानांच्या (narendra modi) या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर कुणी उशीरा सुचलेले शहानपण असंही या निर्णयाला संबोधलं आहे. तर दुसरीकडे माजी मंत्री सदाभाऊ खोत (sadabhau Khot) यांनी इतिहासात आजच्या दिवसाची "सर्वात काळा दिवस" अशी नोंद होईल, ही प्रतिक्रिया फेसबूक पोस्ट करून दिली आहे. तुम्ही जर तुमचं भल करणाऱ्याच्या मागं भक्कम उभं राहिला नाहीत तर तुमच्या जीवावर उठणारे जिंकतात, असंही खोत म्हणाले आहेत.

पुढे सदाभाऊ खोत म्हणतात, तीन कृषी कायदे मागे घेण्याची दुर्दैवी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. हा आघात शेतकऱ्यांना सहन होण्यापलिकडचा आहे. आता कोठे शेतकऱ्यांच्या अंधारलेल्या जीवनात प्रकाशाची चार किरणे पसरण्याची शक्यता तयार झाली होती. पण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि डाव्या पक्षांच्या अभद्र युतीने ही अंधुकशी शक्यताही हाणून पाडली. गेले वर्षभर अपप्रचाराचा गदारोळ उठवून शेतकरी स्वातंत्र्याच्या नरडीचा घोट घेण्यात तीनही पक्ष यशस्वी झाले आहेत.

खरेतर केंद्र सरकारने आतापर्यंत ठामपणे या शेतकरी विरोधी पक्षांना दाद दिली नव्हती. पण अखेरीस केंद्र सरकार नमले. कदाचित आगामी निवडणुका लक्षात घेऊन केंद्राने हे पाऊल उचलले असेल. पण हा निर्णय चुकीचा आहे. शेतकर्यांना पुन्हा एकदा पारतंत्र्याच्या पाताळात गाडणारा आहे. 

पुढे बोलताना खोतांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. आता परत एकदा नव्या जोमाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यातील मार्केट कमिट्या शेतकऱ्यांची कत्तल सुरू करतील. राजकीय दलाल आणि अडत्यांचे शेतकऱ्यांना लुटणारे अड्डे बळकट होतील. मार्केट कमिटीतील शेतकऱ्यांचे रक्त पिणाऱ्या जळवांनी आता सुटकेचा निःश्वास टाकला असेल. आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि डाव्या पक्षांच्या फौजा नव्या जोमाने शेतकऱ्यांच्या वावरात शिरतील. त्याचा घाम गाळून पिकवलेला शेतमाल हव्या त्या दरात लुटून नेतील, असा घणाघात खोतांनी कृषी कायदे रद्द झाल्यांनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केला आहे.

टॅग्स :PuneपुणेSadabhau Khotसदाभाउ खोत pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र