शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात विना उमेदवार काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 18:36 IST

पुणे लोकसभेचा काँग्रेसचा उमेदवार शनिवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती

ठळक मुद्देकसबा गणपतीचे दर्शन घेऊन पदयात्रा काढली जाणार

पुणे :  पुणे लोकसभेसाठी रविवारी सुट्टीचा योग साधून काँग्रेसने आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी फटाक्यांची आताषबाजी, बँड वादन, पक्षाचे झेंडे,  गली गली में शोर हे चौकीदार चोर है सारख्या घोषणा यांनी काँग्रेसच्या प्रचाराचा सुरुवात झाली. पक्षाकडून कुणाही उमेदवाराची घोषणा न झाल्यामुळे विना उमेदवार आणि सर्व इच्छुक उमेदवारांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह रविवारी सायंकाळी कसबा गणपतीचे दर्शन घेऊन पक्षाच्या वाटचालीस सुरुवात केली. यावेळी काँग्रेसचे अभय छाजेड , रमेश बागवे, मोहन जोशी, प्रवीण गायकवाड , अरविंद शिंदे, यांच्यासह राष्ट्रवादीकडून खासदार वंदना चव्हाण, अंकुश काकडे, आदी नेते उपस्थित होते. 

काँग्रेस नेतृत्वाने अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही. त्यामुळे काँग्रेसचा प्रचाराचा नारळ उमेदवाराशिवाय फोडण्याची तयारी करण्यात आली आहे. उमेदवार नसला तरी कसबा गणपतीचे दर्शन घेऊन पदयात्रा काढण्यात येईल, असे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी स्पष्ट केले होते.  पुणे लोकसभेचा काँग्रेसचा उमेदवार शनिवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यानुसार शहर काँग्रेसने रविवारी सुट्टीची संधी साधून प्रचाराचा नारळ फोडण्याचे नियोजन केले होते. दुपारी ४.१५ वाजता कसबा गणपतीचे दर्शन घेऊन पदयात्रा काढली जाणार आहे. पण दुपारी अडीच वाजेपर्यंत दिल्लीतून उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नव्हती. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अद्याप उमेदवारी जाहीर न झाल्याने प्रचाराचा नारळ कसा फोडायचा, असा प्रश्न कार्यकर्ते विचारू लागले आहेत. उमेदवारशिवाय प्रचाराला सुरूवात केल्यास विरोधकांकडून त्याचे भांडवल केले जाऊ शकते, अशीही चर्चा आहे.शहराध्यक्ष बागवे यांनी मात्र प्रचार फेरी निघणारच, असे स्पष्टपणे सांगितले. उमेदवाराची घोषणा झाली नाही, तरी कसबा गणपतीचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरूवात केली जाणार आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन फेरीत केले जाईल, असे ते म्हणाले. दरम्यान, कसबा विधानसभा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्यातूनच प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. त्वष्टा कासार मंदिर, पवळे चौक, साततोटी चौक, फडके हौद, आरसीएम गुजराथी हायस्कूल या मागार्ने पदयात्रा जाणार असून नगरसेवक रविंद्र धंगेकर यांच्या कार्यालयाजवळ समारोप होईल. पदयात्रेच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी काँग्रेसकडून नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व इतर मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकतेर्ही या पदयात्रेत सहभागी होणार आहेत.   

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक