आज शहरातील १८६ केंद्रांवर प्रत्येकी २५० कोविशिल्ड लस उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:15 IST2021-09-07T04:15:18+5:302021-09-07T04:15:18+5:30
पुणे : पुणे महापालिकेला शासनाकडून शनिवारी नव्याने कोविशिल्ड लस प्राप्त झाल्यामुळे, मंगळवारी (दि. ७) १८६ लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी २५० ...

आज शहरातील १८६ केंद्रांवर प्रत्येकी २५० कोविशिल्ड लस उपलब्ध
पुणे : पुणे महापालिकेला शासनाकडून शनिवारी नव्याने कोविशिल्ड लस प्राप्त झाल्यामुळे, मंगळवारी (दि. ७) १८६ लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी २५० लसीचे डोस महापालिकेकडून वितरित करण्यात आले आहेत़ तर ससूनसह महापालिकेच्या झोननिहाय ११ दवाखान्यांत प्रत्येकी ३०० कोव्हॅक्सिन लस देण्यात आली आहे.
आज लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना १५ टक्के लस ही आॅनलाईन बुकिंगव्दारे, तर १५ टक्के लस ही आॅन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे. तर कोविशिल्ड लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ३५ टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना (१४ जूनपूर्वी लस घेतलेल्यांना) आॅनलाइन बुकिंगव्दारे तर ३५ टक्के लस ही आॅन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे.
दरम्यान, लसीकरण केंद्रांवर उपस्थित असलेल्या दिव्यांग नागरिक (दिव्यांग प्रमाणपत्रासह), गरोदर स्त्रिया, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी (ओळखपत्रासह) यांनाही प्राधान्याने लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे़ शिल्लक लस आॅन स्पॉट नोंदणी करून उपस्थित नागरिकांना देण्यात येतील़, अशी माहिती लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.
लसीकरणाच्या आॅनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.