आज शहरात १८८ केंद्रांवर प्रत्येकी २०० कोविशिल्ड लस उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:15 IST2021-08-20T04:15:23+5:302021-08-20T04:15:23+5:30

पुणे : महापालिकेला गुरुवारी ६१ हजार कोविशिल्ड लस शासनाकडून प्राप्त झाल्यामुळे, आज (शुक्रवार, दि.२०) शहरातील १८८ लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी ...

Today, 200 Covishield vaccines are available at 188 centers in the city | आज शहरात १८८ केंद्रांवर प्रत्येकी २०० कोविशिल्ड लस उपलब्ध

आज शहरात १८८ केंद्रांवर प्रत्येकी २०० कोविशिल्ड लस उपलब्ध

पुणे : महापालिकेला गुरुवारी ६१ हजार कोविशिल्ड लस शासनाकडून प्राप्त झाल्यामुळे, आज (शुक्रवार, दि.२०) शहरातील १८८ लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी २०० लसीचे डोस महापालिकेकडून वितरित करण्यात आले आहेत़, तर ससूनसह महापालिकेच्या झोननिहाय ७ दवाखान्यांत प्रत्येकी ३०० कोव्हॅक्सिन लस देण्यात आली आहे.

लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना १५ टक्के लस ही आॅनलाईन बुकिंगद्वारे, तर १५ टक्के लस ही आॅन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे़ तर कोविशिल्ड लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ३५ टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना (२८ मे पूर्वी लस घेतलेल्यांना) आॅनलाईन बुकिंगद्वारे तर ३५ टक्के लस ही आॅन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे़ यानंतरही लस शिल्लक राहिल्यास आॅन स्पॉट नोंदणी करून उपस्थित नागरिकांना लस देण्यात यावी, अशा सूचना प्रत्येक लसीकरण केंद्रास देण्यात आल्या असल्याची माहिती लसीकरण अधिकारी डॉ़ सूर्यकांत देवकर यांनी दिली.

लसीकरणाच्या ऑनलाईन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.

--------------------

Web Title: Today, 200 Covishield vaccines are available at 188 centers in the city