आज ६० केंद्रांवर प्रत्येकी १०० कोविशिल्ड लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:14 IST2021-09-09T04:14:54+5:302021-09-09T04:14:54+5:30

पुणे : पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रत्येकी ४ अशा ६० लसीकरण केंद्रांवर आज (गुरुवार दि.९) प्रत्येकी १०० लसीचे ...

Today, 100 Covishield vaccines each at 60 centers | आज ६० केंद्रांवर प्रत्येकी १०० कोविशिल्ड लस

आज ६० केंद्रांवर प्रत्येकी १०० कोविशिल्ड लस

पुणे : पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रत्येकी ४ अशा ६० लसीकरण केंद्रांवर आज (गुरुवार दि.९) प्रत्येकी १०० लसीचे डोस वितरित करण्यात आले आहेत़ दरम्यान आज शहरात कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असणार नाही.

लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना १५ टक्के लस ही आॅनलाईन बुकिंगद्वारे, तर १५ टक्के लस ही आॅन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे. तर कोविशिल्ड लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ३५ टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना (१६ जून पूर्वी लस घेतलेल्यांना) आॅनलाईन बुकिंगद्वारे तर ३५ टक्के लस ही आॅन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे.

लसीकरणाच्या आॅनलाईन बुकिंग करिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.

--------------------

Web Title: Today, 100 Covishield vaccines each at 60 centers