शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

”जीवनाला कंटाळले..”, चिठ्ठी लिहिली अन् गर्भवतीने उचलले टोकाचे पाऊल; कोंढव्यातील हृदयद्रावक घटना

By किरण शिंदे | Updated: July 2, 2025 21:26 IST

“मी जीवनाला कंटाळले आहे, कोणावरही कोणतीही तक्रार नाही”, असे चिठ्ठीत लिहून जीवनयात्रा संपवली

पुणे: पुण्यातील कोंढवा परिसरात बुधवार (2 जुलै) दुपारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. एका सात महिन्यांच्या गर्भवती महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. खजुरा सुरेश सुनार (वय १९) असे आयुष्य संपवलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सदर महिला आणि तिचा पती नेपाळमधील रहिवासी असून, मागील काही महिन्यांपासून कोंढवा परिसरात भाड्याने राहत होते. पती सुरक्षा रक्षकाची नोकरी करत असून पत्नी गृहिणी होती. दररोजप्रमाणे पती कामावर गेल्यानंतर दुपारी या महिलेने राहत्या घरात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. सायंकाळी पती घरी परतल्यानंतर त्याने अनेक वेळा दरवाजा ठोठावला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा पत्नीने गळफास घेतल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्याने तातडीने कोंढवा पोलीस ठाण्यात संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

पोलीस घटनास्थळी दाखल होत मृतदेह खाली उतरवून पोस्टमॉर्टेमसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. घराची तपासणी करताना पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. त्या चिठ्ठीत, “मी जीवनाला कंटाळले आहे. कोणावरही कोणतीही तक्रार नाही.” असे लिहिले असल्याचे पोलिसांनी सांगितले. कोंढवा पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आत्महत्येच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, मानसिक आरोग्य आणि गर्भवती महिलांवरील मानसिक तणाव या बाबी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाKondhvaकोंढवाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूpregnant womanगर्भवती महिला