पतीच्या छळाला कंटाळून महिलेने उचलले टोकाचे पाऊल; पतीविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 21:16 IST2025-05-26T21:12:53+5:302025-05-26T21:16:31+5:30

मिळालेल्या माहितीनुसार, श्रेया शिवाजी देडे रा. मासाळवाडी ता. बारामती (लग्नापूर्वीचे नाव : श्रेया रामचंद्र जाधव, वय २२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

Tired of her husband's harassment, a woman took extreme steps; a case was registered against her husband | पतीच्या छळाला कंटाळून महिलेने उचलले टोकाचे पाऊल; पतीविरोधात गुन्हा दाखल

पतीच्या छळाला कंटाळून महिलेने उचलले टोकाचे पाऊल; पतीविरोधात गुन्हा दाखल

सोमेश्वरनगर :  पती वारंवार इन्स्टाग्राम व व्हॉट्स अपवर चॅटिंग दुसऱ्याच महिलेशी  चॅटींग करतो. त्यामुळे नवऱ्याच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून एका २२ वर्षीय विवाहतेने लोखंडी गाजला गळफास घेत आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली. 

मिळालेल्या माहितीनुसार, श्रेया शिवाजी देडे रा. मासाळवाडी ता. बारामती (लग्नापूर्वीचे नाव : श्रेया रामचंद्र जाधव, वय २२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मयत श्रेया हिचा भाऊ प्रीतम रामचंद्र जाधव रा. शीरढोण ता. कोरेगाव जि सातारा याने वडगाव निंबाळकर पोलीसात फिर्यात दिली आहे. यावरून पती शिवाजी माणिक देडे रा. मासाळवाडी ता. बारामती याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 श्रेया हिने शिवाजी देडे याच्याशी नऊ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. परंतु विवाहानंतरही तो सानिया कुरेशी या मुलीशी लग्न केल्याचे सांगत तिला घरी घेवून आला. तसेच तिच्याशी इन्टाग्राम व व्हाटसअपवर चॅटींग केले. यामुळे पत्नी श्रेया हिने पतीला विचारणा केली, समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला. परंतु त्याने तिचे न एकता तिलाच शारिरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. या छळाला कंटाळून अखेर श्रेया हिने शनिवारी (दि. २४) रोजी दुपारी राहत्या घरात लोखंडी अगलला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड अधिक तपास करत आहेत.

Web Title: Tired of her husband's harassment, a woman took extreme steps; a case was registered against her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.