- हनुमंत देवकरचाकण : पुणे जिल्ह्यातील कुरुळी ( ता.खेड ) येथील यात्रेनिमित्त झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीत एक २५ वर्षांचा युवक गंभीररीत्या भाजून जखमी झाला असल्याची दुर्दैवी घटना आज रविवार ( दि. ८ ) रोजी रात्री अकरा वाजून पाच मिनिटांनी घडली आहे. आज कुरुळी गावची ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांची यात्रा संपन्न होत असताना रात्रीच्या वेळी गावात फटाकेबाजी करताना अचानक मोठा स्फोट होऊन एका युवकाला आग लागली, त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. ग्रामस्थांनी जखमी युवकास त्वरित रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्या तरुणाचे नाव बल्या डोंगरे ( वय 20 ) अशी माहिती मिळाली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
कुरुळीत यात्रेनिमित्त फटाक्यांच्या आतषबाजीत युवक पेटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 23:40 IST