शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काळ आला होता, पण... नशीब बलवत्तर; १६ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 13:02 IST

डिंगोरे ग्रामस्थांच्या सतर्कतेने टळली दुर्घटना; मद्यपी चालकाला दिला चोप

ठळक मुद्देबसचालकाविरुद्ध गुन्हा दाखलस्कूलबस चालकाबाबत व शाळा प्रशासनाबाबत उपस्थितांमधून मोठ्या तीव्र संतापाची भावना

ओतूर : काळ आला होता; पण वेळ आली नसल्याची प्रचिती गुरुवारी ओतूरच्या नागरिकांनी अनुभवली. डिंगोरेच्या सतर्क ग्रामस्थांनी मद्यपी स्कूल बसचालकाला वेळीच अटकाव केल्याने होणारा अपघात टळला व १६ चिमुकल्या विद्यार्थ्यांचे प्राण वाचले.नगर-कल्याण महामार्गावरील डिंगोरे (ता. जुन्नर) येथील बस थांब्याजवळ बुधवारी ओतूर येथील सेंट डेब्यूज स्मार्ट इंग्लिश मीडियम स्कलचा बसचालक सरळ रस्ता असताना तो बस आडवी- तिडवी चालवत  होता. ही स्कूल बस डिंगोरे गावाकडून बल्लाळवाडीकडे  जाणाऱ्या वळणावर तेथील हॉटेल समोर उभ्या असलेल्या नागरिकांच्या लक्षात आली. बसच्या एका बाजूला मोठा खोल खड्डा  होता, पुढे महावितरणचा डीपी होता, त्यांनी बसला रस्त्यावर उभे राहून बस चालकाला बस थांबविण्यास भाग पाडले. बस थांबल्यावर चालकाला खाली उतरविले, तेव्हा तो मद्य पिऊन तर्र झालेला आढळलला.  प्रसंग इतका बाका होता की, काही क्षणाचा उशीर झाला असता व बस थांबविली नसती, तर  बस बाजूच्या खड्ड्यात जाऊन पडली असती व मोठी दुर्घटना झाली असती. 

बस थांबल्याने १६ विद्यार्थ्यांचे दैव बलवत्तर म्हणून प्राण वाचले. ओतूर पोलिसांनी अटक केलेला बसचालकाचे नाव आशुतोष विलास जगताप (रा. उदापूर, ता. जुन्नर) आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती ठाणे अंमलदार विकास गोसावी यांनी दिली.  संतप्त ग्रामस्थांनी त्यास चोप दिला. त्याची दारूची नशा कमी होण्यासाठी त्याला कोरा चहा पाजण्यात येऊन विद्यार्थ्यांना बसमधून सुरक्षितपणे खाली उतरविण्यात आले व नंतर पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. अंगावर शहारे आणणारी घटना गावभर समजल्यावर स्थानिक लोक घटनास्थळी  जमा झाले. त्यातील बहुतेकांनी ओतूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळ गाठून लगोलग चालकाला ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळी मोठ्या प्रमाणात संतप्त जमाव जमला होता. त्यास जि. प. सदस्य अंकुशशेठ आमले, माजी जि. प. सदस्य बबनराव तांबे यांनी शांत राहण्यासाठी आवाहन केले. आपल्या चिमुकल्या मुलांचा जीव धोक्यात घालणाऱ्या स्कूलबस चालकाबाबत व शाळा प्रशासनाबाबत उपस्थितांमधून मोठ्या तीव्र संतापाची भावना व्यक्त होत होत्या.   सदरची स्कूलबस (एमएच १४ सीडब्ल्यू २४२९) ही श्री संत गाडगे महाराज मिशन मुंबई संचलित ओतूर (ता. जुन्नर) शाखा अंतर्गत सुरू असलेल्या सेंट डेब्युज इंग्लिश मीडियम स्कूलची आहे. बसमध्ये उदापूर, डिंगोरे, आमले शिवार, बल्लाळवाडी परिसरातील १६ विद्यार्थी  शाळेत जाण्यासाठी गोळा करण्यात आले होते. ओतूर पोलिसांनी अटक केलेला बसचालक नाव आशुतोष विलास जगताप रा. उदापूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती ठाणे अंमलदार विकास गोसावी यांनी दिली असून, सीआरनं. ६८ ,भादंवि कलम २७९,३३६, मो.व्हे. अ‍ॅक्ट १८४,१८५ नुसार कारवाई करण्यात आली आहे.आपल्या मुलांचे प्राण वाचविणाºया डिंगोरे ग्रामस्थांचे विद्यार्थ्यांच्या पालकांनी मनोमन आभार मानले. डिंगोरे येथील उद्योजक विश्वासराव आमले, बच्चू आचार्य, संपत खरात, सतीश मंडलिक, बबन शिंगोटे, संदीप शिंगोटे, मकरंद लोहटे, शिवाजी शेरकर, अकबर इनामदार, संतोष मवाळ, बन्सी शेख, संतोष आमले, पांडुरंग बनकर आदी ग्रामस्थांची या दुर्घटनेत मोलाची मदत झाली ......................गाडगे महाराज मिशन संस्थेचे संचालक नितीन पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आमचा नेहमीचा चालक आजच्या घटनेवेळी रजेवर असल्यामुळे त्या गाडीवर बदली चालक देण्यात आल्याची माहिती दिली आहे. मात्र, इतक्या सकाळीच मद्यधुंद चालक  गाडी घेऊन जात असताना दुर्लक्ष करण्यात आल्याने शाळा प्रशासनाचा बेजबाबदारपणा दृष्टिआड करता येत नाही. 

परिणामी, स्कूलबसमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाºयावरच असल्याने संबंधित बेजबाबदार  शैक्षणिक संस्था प्रशासन व  स्कूलबसचा चालक जगताप यावर कडक कारवाई करण्याची मागणी  घटनास्थळी जमलेल्या जमावाने व्यक्त केली आहे.

 

टॅग्स :Junnarजुन्नरSchoolशाळाStudentविद्यार्थीAccidentअपघातBus Driverबसचालक