Tiktak star Sameer Gaikwad suicide : पुण्यात टिकटॉक स्टार समीर गायकवाड याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 09:57 IST2021-02-21T23:23:25+5:302021-02-22T09:57:22+5:30
Tiktak star Sameer Gaikwad commits suicide: टिकटॉक स्टार समीर गायकवाड याने रविवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

Tiktak star Sameer Gaikwad suicide : पुण्यात टिकटॉक स्टार समीर गायकवाड याची आत्महत्या
पुणे : टिकटॉक स्टार समीर गायकवाड याने रविवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
समीर मनीष गायकवाड (वय २२, रा. निकासा सोसायटी, केसनंद रोड, वाघोली) याने राहत्या घरी पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. समीर याचा भाऊ प्रफुल्ल रोहिदास गायकवाड यांनी याची माहिती लोणीकंद पोलिसांना दिली. समीर याने गळफास घेतल्याचे समजल्यावर त्याला खाली उतरुन लाईफ लाईन हॉस्पिटलला तातडीने नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यु झाल्याचे सांगितले. त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण समोर आले नाही. आत्महत्येपूर्वी त्याने कोणतीही चिठ्ठी लिहिल्याचे घरात आढळून आले नाही.
म्युझिक व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून समीर तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला होता. तो पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता.