शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना प्रभावित क्षेत्रात लॉकडाऊन अधिक कडक करा; केंद्रीय उच्चस्तरीय पथकाचे जिल्हा प्रशासनाला आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 21:06 IST

कोरोना प्रभावित संपूर्ण क्षेत्राचे तातडीने सर्वेक्षण, वैद्यकीय तपासण्या वाढविण्याबरोबरच संस्थात्मक क्वारंटाईनवर अधिक भर देण्याचे आदेश

ठळक मुद्देकोरोनाबाधितांची वाढती संख्या, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना, नियोजन याचा आढावा बारामती पॅटर्न व ग्रामीण भागातील उपाययोजनांबाबत उच्चस्तरीय केंद्रीय पथक समाधानी

पुणे : पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि काही ग्रामीण भागात कोरोना विषाणूचे रूग्ण प्रचंड वेगाने वाढत आहे. यामुळे कोरोना प्रभावित क्षेत्रात लॉकडाऊन अधिक कडक करा, संबंधित संपूर्ण क्षेत्राचे तातडीने सर्वेक्षण करा, वैद्यकीय तपासण्या वाढविण्याबरोबरच संस्थात्मक क्वारंटाईनवर अधिक भर देण्याचे आदेश पुणे जिल्ह्याच्या दौ-यावर आलेल्या उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने जिल्हा प्रशासनाला दिले. दरम्यान जिल्ह्यातील बारामती पॅटर्न व ग्रामीण भागातील उपाययोजनांबाब या पथक समाधान देखील व्यक्त केले.पुणे शहर व जिल्हयात वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय केन्द्रीय स्तरावरील पथक पुणे जिल्ह्यात 25 एप्रिल रोजी दाखल झाले आहे. या केंद्रीय पथकाने विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे भेट देवून पाहणी केली. त्यानंतर बुधवार (दि.29) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पुणे जिल्हयातील कोरोनाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.    जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य सेवेचे अतिरिक्त सल्लागार डॉ. ए. के. गडपाले यांच्या अध्यक्षतेखाली कोविड 19 ची वाढती संख्या, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना व त्या अनुषंगाने भविष्यात करावयाचे नियोजन याचा आढावा घेतला. यावेळी मायक्रोबायोलॉजी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे संचालक डॉ. व्ही. एस. रंधावा, अनेस्थेशिया आणि गहन काळजी युनिटचे डॉ. अंशु गुप्ता, कम्युनिटी मेडिसीन एबीव्हीआयएमएस आणि आरएमएल हॉस्पिटलचे सहायक प्रा. डॉ. सागर बोरकर उपस्थित होते.डॉ. गडपाले म्हणाले, पुणे जिल्हयातील ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजना अत्यंत समाधानकारक आहेत, बारामती पॅटर्नच्या माध्यमातून चांगले काम सुरू आहे. झोपडपट्टीच्या अथवा जास्त घरांची गर्दी असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करावे. सार्वजनिक स्वच्छतागृह आहे तेथे अधिक काळजी घेण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. प्रारंभी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्हा प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनेबाबतची माहिती दिली. जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शहरातील सर्व रुग्णालये सक्षम केली आहेत. विविध पथके निर्माण करून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली असून सर्वेक्षण आणि चाचण्या करण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, सचिन बारवकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCentral Governmentकेंद्र सरकारhospitalहॉस्पिटलBaramatiबारामती