वाघाच्या कातड्याची तस्करी करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:16 IST2020-12-05T04:16:41+5:302020-12-05T04:16:41+5:30
पुणे:वाघाच्या कातड्याची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

वाघाच्या कातड्याची तस्करी करणाऱ्यास अटक
पुणे:वाघाच्या कातड्याची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शकील जान महम्मद शेख (वय ३०, रा. गल्ली नं. १२, अप्पर डेपो) असे आरोपीचे नाव आहे. शेख यास न्यायालयात हजर केले असता पाच डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
एक डिसेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास स्वारगेट परिसरात हा प्रकार उघडकीस आला. त्याच्याकडून १५ लाख रुपये किमतीचे वाघाचे कातडे जप्त करण्यात आले आहेत. आरोपीने वाघाची शिकार करून त्याचे कातडे मिळवल्याची शक्यता आहे. त्याने शिकार कधी व कोठे केली याचा तपास करायचा आहे, प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणारी मोठी टोळी असण्याची शक्यता आहे. या बाबतचा तपास करायचा असल्याने सहायक सरकारी वकील संजय दीक्षित यांनी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी केली.