शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

मासे पहायचेत?, मग द्या दहापट पैसे; संभाजी उद्यानात नूतनीकरणाच्या नावाखाली वाढीव बोजा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 3:27 PM

संभाजी उद्यानातील आबालवृद्धांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या मस्त्यालयाचे दर वाढवण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे. नूतनीकरणामुळे दर वाढवत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ठळक मुद्देनूतनीकरणामुळे दर वाढवत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्टीकरणप्रौढांसाठी तो २० रूपये व लहानांसाठी १० रूपये करण्याचा स्थायी समितीसमोर प्रस्ताव

पुणे : संभाजी उद्यानातील आबालवृद्धांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या मस्त्यालयाचे दर वाढवण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे. नूतनीकरणामुळे दर वाढवत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. २ रूपयांवरून २० रूपये व १ रूपयांवरून १० रूपये असा दर प्रस्तावित करण्यात आला आहे. स्थायी समितीकडून यात कपात करून हा दर १० व ५ रूपये केला जाण्याची शक्यता आहे.गेल्या अनेक वर्षांपासून संभाजी उद्यानातील मत्स्यालय पुणेकरांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. सन १९५३ मध्ये त्याचे उद्घाटन करण्यात आले. मुंबईतील तारापोरवाला मस्त्यालयापासून त्याची प्रेरणा घेण्यात आली. लहान आकाराच्या काचेच्या पेट्यांमध्ये ठेवलेले रंगीत मासे पाहून मुले हरखून जातात. पेटीच्या बाहेर एका लहानशा पेटीवर त्यातील माशांची माहितीही दिलेली आहे. नेहमीच्या माशांशिवाय त्यात दुर्मिळ मासेही असल्यामुळे मुलांना त्याची माहिती मिळते.या मत्स्यालयाचे सन १९९४ मध्ये नूतनीकरण करण्यात आले. त्याआधी त्याचा दर प्रौढांसाठी १ रूपये व लहानांसाठी २० पैसे असा दर होता. तो सन १९४ मध्ये २ रूपये व १ रूपया करण्यात आला. आता परत या मत्स्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यात पेटीतील लहान शार्कपासून ते भाग्यकारी समजल्या जाणार्‍या काही परदेशी जातीच्या माशांचाही समावेश आहे. तसेच आकर्षक छताबरोबरच जमीनही रंगीत व मुलांना आवडेल अशी करण्यात आली आहे.त्यामुळेच आता प्रशासनाने याचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रौढांसाठी तो २० रूपये व लहानांसाठी १० रूपये करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. संभाजी उद्यान हे महापालिकेचे शहरातील बरेच जुने उद्यान आहे. तिथे अनेक पुणेकर मुलांसह येतजात असतात. त्यात पेठेत राहणार्‍‍‍‍या गरीब कुटुंबांचाही समावेश आहे. उद्यान हे काही महापालिकेचे नफा कमवण्याचे साधन नाही. त्यामुळे स्थायी समितीकडून हे दर कमी केले जाण्याची शक्यता आहे. ते प्रौढांसाठी १० रूपये व लहानांसाठी ५ रूपये केले जातील, असे दिसते आहे. 

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे