शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

टिक् टिक् वाजते डोक्यात... धडधड वाढते ठोक्यात...!

By admin | Updated: March 4, 2015 00:32 IST

दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका मिळणार आहे, त्यामुळे आधी ती शांतपणे वाचून घे, कोणता प्रश्न कधी सोडवायचा त्याचे नियोजन कर, मग वेळेत प्रश्नपत्रिका सोडवं...,’’

पुणे: ‘‘दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका मिळणार आहे, त्यामुळे आधी ती शांतपणे वाचून घे, कोणता प्रश्न कधी सोडवायचा त्याचे नियोजन कर, मग वेळेत प्रश्नपत्रिका सोडवं...,’’ अशा सूचना देणारे पालक आणि बैठक क्रमांक शोधण्यासाठी परीक्षा केंद्रात धावाधाव करणारे विद्यार्थी. तर पहिला पेपर मराठीचा, चांगला सोडव अशा एकमेकांना शुभेच्छा देणारे मित्र, असे चित्र मंगळवारी शहरातील विविध शाळांसमोर दिसून आले.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवारी दहावीची परीक्षा सुरू करण्यात आली. शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर सकाळी दहापासूनच पालकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक स्वत: विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी आले होते. बोर्डाचा पहिलाच पेपर असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये थोडी धाकधूूक होती. पालक विद्यार्थ्यांची समजूत काढून शांतपणे पेपर सोडव, मराठीचा पेपर आहे, घाबरू नकोस. प्रश्नपत्रिका मिळाली की ती पहिल्यांदा वाचून काढ, अकरा वाजल्याशिवाय उत्तरपत्रिका लिहिण्यास सुरुवात करू नकोस, असे सांगताना दिसत होते.परीक्षा केंद्राबाहेर पडल्यानंतर अनेक विद्यार्थी व पालक दुसरा पेपर कोणत्या परीक्षा केंद्रावर आहे, याची माहिती घेताना दिसत होते. तर कोणते कोणते प्रश्न सोडविले, असे विचारून काही पालक परीक्षा केंद्रावरच मुलांची शाळा घेत असल्याचेही चित्र दिसून आले. (प्रतिनिधी)४मुले परीक्षा केंद्रात गेल्यानंतर पालकांची अस्वस्थता वाढली होती. मात्र, परीक्षा देऊन आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून पालकांची अस्वस्थता कमी झाली. ‘‘ बाबा, पेपर सोप्पा गेला..., सर्व प्रश्न वेळेत सोडवले. चांगले मार्क पडतील’’ असे मुलांनी सांगताच पालक मोकळा श्वास घेत होते.४दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका दिल्यामुळे कोणता प्रश्न कधी सोडवावा, याचा निर्णय घेण्यास पुरेसा अवधी मिळाला. नियोजन करता आले. विचार करण्यास वेळ मिळाला. त्यामुळे सर्व पेपर वेळेत सोडवता आला, अशी प्रतिक्रिया परीक्षार्थी जयेश वाखरे व प्रतीक्षा डोंगरे यांनी व्यक्त केली.