पुणे ते वैष्णोदेवी थरारक सायकल प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:18 IST2021-02-18T04:18:39+5:302021-02-18T04:18:39+5:30

धनकवडी : राग आणि वेग यांचे जवळचं नातं आहे. रागाच्या भरात लोक काय काय करून बसतात, हे आपण रोज ...

Thrilling cycle journey from Pune to Vaishnodevi | पुणे ते वैष्णोदेवी थरारक सायकल प्रवास

पुणे ते वैष्णोदेवी थरारक सायकल प्रवास

धनकवडी : राग आणि वेग यांचे जवळचं नातं आहे. रागाच्या भरात लोक काय काय करून बसतात, हे आपण रोज पेपरला वाचतो. पण, रागाला विधायक दिशा दिली, सायकलचे हॅंडल, पायाला पॅडल आणि वेग पकडला तर साक्षात वैष्णोदेवी मातेचे दर्शन होऊ शकते. हा चमत्कार नसून वस्तुस्थिती आहे. पुण्याच्या शिंदेवाडीतील महेश गोगावले यांनी पुणे ते वैष्णोदेवी असा २५०० किमीचा प्रवास करून मातेचे दर्शन घेतले.

२०१५ मध्ये रागाच्या भरात त्यांनी चालू केलेला सायकल प्रवास अखंड सुरू असून, असाच 'पुणे ते वैष्णोदेवी' हा सायकल प्रवास त्यांनी नुकताच पूर्ण केला आणि वैष्णोदेवी मातेचे दर्शन घेतले.

कोट

आपला अनुभव सांगताना महेश गोगावले म्हणाले," प्रवासादरम्यान अनेक चांगले- वाईट अनुभव घेतले. प्रवास करताना चार वेळा सायकल पंक्चर झाली. खरंतर एका दिवसाचे उद्दिष्ट १२० किमी प्रतिदिन असे होते, परंतु वातावरणात दिवसागणिक बदल होत असल्यामुळे प्रति दिवस फक्त ८० किमी प्रवास झाला व प्रवासाचे दिवस वाढले. या दिवसात उत्तरेकडील भागात प्रचंड थंडी असते. परंतु कोणत्याही परिस्थितीला शरण न जाता प्रवास चालू ठेवला.

पुण्यातून लोनावळा, पनवेल पालघर, सुरत, बडोदा, अहमदाबाद, गांधीनगर, उदयपूर, जयपूर, हरियाणा, दिल्ली, सोनीपत, पानिपत, अमृतसर, अंबाला, जालिंदर, पठाणकोट, जम्मू-काश्मीर सिटी आणि आखेर कटरा वैष्णोदेवी असा एकूण २५०० किलोमीटर प्रवास सायकलवर १ महिन्यात पूर्ण केला.

महेश गोगावले यांच्या कामगिरीची दखल घेऊन वंदेमातरम संघटना, कौशल्य विकास प्रतिष्ठान आणि येवले फाऊंडेशनच्या वतीने त्यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी नवनाथ येवले, वंदेमातरम संघटनेचे प्रशांत नरवडे, स्वीकृत नगरसेवक तुषार कदम, संतोष देवकर, मंगेश जाधव, नीलेश येवले, सागर म्हस्के, अमोल कोकरे उपस्थित होते.

Web Title: Thrilling cycle journey from Pune to Vaishnodevi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.