शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपटाला शोभेल असा थरार! आजोबांच्या मांडीवर खेळणाऱ्या दीड वर्षाच्या बाळाला पळविण्याचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 22:44 IST

बारामतीतील घटना; पोलिसांच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला..

ठळक मुद्देअपहरणाचे कारण अद्याप अस्पष्ट

बारामती: घरासमोर आजोबांच्या मांडीवर खेळणाऱ्या दीड वर्षीय बालकाला मंगळवारी (दि. १५) रात्री ९.१५ च्या सुमारास महिलेने पळवुन नेले.यावेळी बालकाला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आजोबांसह दीड वर्षाच्या बाळाला स्थानिक नागरिकांना तिने दगड मारुन रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र,पोलिसांच्या तत्परतेमुळे त्या महिलेचा प्रयत्न फसला.चित्रपटात शोभेल असा थरारक प्रसंग बारामतीच्या भरवस्तीत घडला.त्याची चर्चा सर्वत्र होती.

पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी याबाबत माहिती दिली. मंगळवारी रात्री हरून मलंग झारी (रा.  माळेगाव रोड कसबा बारामती)  हे त्यांचानातू आहाद (वय दीड वर्षे) यास घराचे समोर खेळवत बसले होते. त्यावेळीतेथे अंधारातून एक महिला चालत आली. तिने हरून झारी यांचे हातातून आहादयास हिसकावले.त्यानंतर त्याला पळवून घेऊन जावू लागली. त्यावेळी  झारी यांनी त्या महिलेस विरोध केल्यावर  तिने त्यांना दगडे फेकुन मारले.यामध्ये हरून यांचे डावे पायावर जखम झाली. त्यावेळी हरून यांनी प्रसंगावधान बाळगत आरडा-ओरड केला.त्यामुळे स्थानिक  तेथे  नागरीक जमा झाले.याच दरम्यान तेथील नागरीकांनी पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांना फोनवर संपर्क करीत या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पाटील यांनी तत्परतेने घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल पोपट कोकाटे व महिला पोलीस कॉन्स्टेबल रचना काळे यांना सरकारी वाहनासह पाठविले. त्यामुळे पोलीस मदत त्याठिकाणी पोहचली.यावेळी महिला लोकांना दगडे मारत होती. कोकाटे व काळे यांनी प्रसंगावधान दाखवत मोठया कौशल्याने त्या बाईचे ताब्यातून त्या दीड वर्षाचा बालक आहाद याची सुखरूप सुटका केली. त्या बाईस पोलीस स्टेशन येथे घेवुन आले.पोलिसांनी केलेल्या चौकशीत जयपाल विराज पवार (वय ३५, रा. इंदापुर दुध डेअरीजवळ, इंदापुर) असे नाव त्या महिलेने सांगितले.हरून मलंग झारी यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलीसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. नागरिकांमधुन पोलीसांचे कौतुक होत आहे. पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आर.डी.साळुखे तपास करत आहेत. अपहरणाचे कारण समजु शकले नाही.पोलीस याबाबत तपास करत असल्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले.—————————————————

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिलाcinemaसिनेमा