सिंधी प्रीमियर लीगचा थरार १६ मार्चपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:12 IST2021-03-09T04:12:28+5:302021-03-09T04:12:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : देशभरात विखुरलेला सिंधी समाज एकत्रित यावा, त्यांच्यात तंदुरुस्तीविषयी जागरूकता व्हावी यासाठी आयोजित होणारी सिंधी ...

सिंधी प्रीमियर लीगचा थरार १६ मार्चपासून
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : देशभरात विखुरलेला सिंधी समाज एकत्रित यावा, त्यांच्यात तंदुरुस्तीविषयी जागरूकता व्हावी यासाठी आयोजित होणारी सिंधी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा यंदा १६ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत पिंपरी येथे खेळली जात आहे. यंदाच्या तिसऱ्या हंगामात १४ संघ स्पर्धेत सहभागी होत आहेत.
पिंपरीतल्या एमसीसी, मृणाल क्रिकेट ग्राउंडवर ही स्पर्धा होणार असून त्याचे थेट प्रक्षेपण सिंधी प्रीमिअर लीग फेसबुक पेजवरून होणार आहे. स्पर्धेतून मिळालेला निधी समाजोपयोगी कामांसाठी देण्यात येणार असल्याची माहिती कन्वल खियानी, हितेश दादलानी यांनी पत्रकार परिषदेत दिली. कमल जेठानी, अंकुश मुलचंदानी, नरेश नशा, करण अस्वाणी, अवि तेजवानी, अवि इसरानी, रवी दर्यानी, पीयूष जेठानी यांच्यासह संघमालक व प्रायोजक उपस्थित होते.
हितेश दादलानी म्हणाले की सिंधी फक्त व्यवसायापुरतेच आहेत, हा समज खोडून काढण्यासाठी आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. कन्वल खियानी म्हणाले, “गेल्या दोन्ही मोसमात झालेल्या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. फेसबुकवर सुमारे ९ लाख लोकांनी ही स्पर्धा पहिली. यंदा स्पर्धेला व्यापक स्वरूप येत असून पुण्यासह परभणी, जळगाव, नांदेड येथूनही खेळाडू सहभागी होत आहेत.
चौकट
हे आहेत चौदा संघ
स्पर्धेतील प्रत्येक संघाचे नाव सिंधी समाजाशी आणि संस्कृतीशी निगडित आहे. त्यात मस्त कलंदर (गीता बिल्डर्स, मयूर तिलवानी), सुलतान ऑफ सिंध (आशुतोष चंदीरमणी, चंदीरमणी असोसिएट्स), मोहेंजोदरो वॉरियर्स (मिलेनियम सेमीकंडक्टर, हरीश अभिचंदानी), सिंधफूल रेंजर्स (अनूप झमटानी, झमटानी ग्रुप), एसएसडी फाल्कन (विकी सुखवानी, सुखवानी लाइफस्पेस), इंडस डायनामॉस (सुमित बोदानी, शगुन टेक्सटाईल), दादा वासवानीज ब्रिगेड (अनिल अस्वाणी, अस्वाणी प्रमोटर अँड बिल्डर), झुलेलाल सुपरकिंग्ज (पियुष जेठानी, जेठानी ग्रुप), हेमू कलानी ग्लॅडिएटर्स (बिपिन डाखनेजा, ट्रिओ ग्रुप), गुरुनानक नाइट्स (प्रकाश रामनानी, पीव्हीआर टाईल्स वर्ल्ड), संत कंवरम रॉयल्स (राहुल लाडकानी, व्हीआरए रोहित सेल्स), आर्यन युनायटेड (राजीव मोटवानी, रोहित इन्फ्रा), जय बाबा स्ट्रायकर्स (सागर सुखवानी, सुखवानी बिल्डटेक) व सिंधी इंडियन्स (मनीष मनसुखवानी, बॉंबे सॅन्डविच) हे संघ स्पर्धेत खेळणार आहेत.