शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

अकराव्या मजल्यावरून पडून ३ कामगारांचा मृत्यू, दत्तवाडीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 03:09 IST

सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानासमोर सुरू असलेल्या बांधकामाच्या अकराव्या मजल्याच्या स्लॅबचे सेंट्रिंग कोसळून तीन कामगारांचा मृत्यू झाला, तर एक कामगार गंभीर जखमी झाला.

पुणे : सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानासमोर सुरू असलेल्या बांधकामाच्या अकराव्या मजल्याच्या स्लॅबचे सेंट्रिंग कोसळून तीन कामगारांचा मृत्यू झाला, तर एक कामगार गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी सकाळी नऊ ते सव्वानऊच्या सुमारास घडली. यातील जखमी कामगाराची प्रकृती चिंताजनक आहे. ठेकेदार अंगद पांचाळ याला अटक केली आहे. बुधवारी दिवाळी सुटीनिमित्त गावी जाण्यासाठी कामगार मंगळवारीच कामावर आले होते.प्रकाशकुमार बिडासाव गुप्ता (वय ३०, रा. बेरोकाला, जि. हजारीबाग, झारखंड), दुलारीचंद्र रामेश्वर राम (वय ३७, रा. चंदनगुडी, जि. हजारीबाग, झारखंड), मिथुन भरत सिंग (वय २०, रा. डुमका, जि. बोट्टा, झारखंड) अशी मृत कामगारांची नावे आहेत, तर रामेश्वर रूपलाल दास (वय २४, रा. बरकठ्ठा, जि. हजारीबाग, झारखंड) असे जखमी कामगाराचे नाव आहे. सिंहगड रस्त्यावर पाटे डेव्हलपर्स यांचा बांधकाम प्रकल्प सुरू आहे. मंगळवारी सकाळी नऊ-सव्वानऊच्या सुमारास अकराव्या मजल्यावरील स्लॅबची सेंट्रिंग कोसळली. पीलरला लाकडी प्लेटा लावताना हा प्रकार घडला. या वेळी चार कामगार तेथे काम करीत होते. त्यापैकी तीन कामगार थेट अकराव्या मजल्यावरून खाली कोसळले. त्यापैकी प्रकाशकुमार या कामगाराचा जागेवरच मृत्यू झाला, तर उर्वरित दोघे रुग्णालयात उपचार घेताना दगावले. चौथा कामगार दहाव्या मजल्यावरून पडताना आश्चर्यकारकरीत्या तिसºया मजल्यावरील सदनिकेच्या आतल्या बाजूला पडला. यामुळे त्याचा जीव वाचला, मात्र तो गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दत्तवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली.गावी जाण्यासाठी सकाळीच कामावरदिवाळीच्या सुटीनिमित्त कामगार बुधवारी त्यांच्या मूळ गावी जाणार होते. यामुळे काम लवकर संपवण्यासाठी ते चौघेही सकाळी आठच्या सुमारास प्रकल्पावर आले होते. प्रकल्पावरील इतर २५ कामगार मात्र काम संपवून खाली उतरले होते. ऐन दिवाळीत ही घटना घडल्याने कामगारवर्गातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.दिवाळी रविवारपर्यंत प्रकल्पाचे काम बंद आहे. मात्र ठेकेदाराला व कामगारांनाही सुटीत गावाला जायचे असल्याने उरलेले काम पूर्ण करण्यासाठी ते कामावर आले होते. त्याची कोणत्याही प्रकारची कल्पना आम्हाला दिली नव्हती. घटना घडल्यावर आम्हाला याची माहिती झाली. ठेकेदारानेही काम करताना सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली होती. मात्र सुरक्षा जाळीवर एकाच वेळी चौघे पडल्याने ती तुटून ही दुर्घटना घडली. यासंदर्भात आम्ही पोलिसांना पूर्ण सहकार्य करीत असून जखमी कामगाराच्या उपचारासाठी, तसेच मृत व्यक्तींच्या घरच्यांना आर्थिक मदतीसाठी सहकार्य करणार आहोत.- प्रमोद वाणी,पाटे डेव्हलपर्स

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे