शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

मॉर्निग वॉकला जाणाऱ्या तीन महिलांना डंपरने चिरडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 15:12 IST

मॉर्निंग वॉकसाठी रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या  तीन महिलांना  पाठीमागून येणाऱ्या डंपरने चिरडले त्यात तिन्ही महिलांचा जागीच मृत्यू  झाला. ही घटना आज सकाळी सहाच्या सुमारास उदापूर  (ता. जुन्नर) गावाच्या हद्दीत हाँटेल कुकडूकू जवळ घडली.

पुणे  : मॉर्निंग वॉकसाठी रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या  तीन महिलांना  पाठीमागून येणाऱ्या डंपरने चिरडले त्यात तिन्ही महिलांचा जागीच मृत्यू  झाला. ही घटना आज (बुधवारी) सकाळी सहाच्या सुमारास उदापूर  (ता. जुन्नर) गावाच्या हद्दीत हाँटेल कुकडूकू जवळ घडली.मीराबाई सुदाम ढमाले (वय ६८) कमलाबाई  महादू ढमाले (वय ६५ ) व सगुणाबाई  बबन गायकर (वय ६५ ) अशी ठार झालेल्या महिलांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती असी की, मीराबाई, कमलाबाई आणि सगुणाबाई या दररोज सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी नगर-कल्याण महामार्गावर जातात. नेहमीप्रमाणे तिघीही आज एकत्रपणे मॉर्निँगवॉकसाठी सकाळी सहाच्या सुमारास नगर-कल्याण महामार्गावर रस्त्याच्या कडेने निघाल्या होत्या. त्याचवेळी नगरकडून कल्याणकडे भरधाव वेगाने निघालेल्या डंपरने त्या तिघींना चाकाखाली चिरडले. तिघीच्याही अंगावर डंपर गेल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला. डंपर चालक न थांबता डंपरसह पळून गेला. सकाळी दूध घेऊन जाणाऱ्या गवळ्यांना त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत रस्त्यावर पडलेला दिसला. त्यांनी तातडीने पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी आल्यावर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

ओतूर पोलिसांनी तात्काळ वाहनाचा तपासाठी पथक कल्याण मार्गाकडे रवाना केले.  या मार्गावरील बनकरफाटा येथे सीसीटीव्ही कँमेरे आहेत ते तपासले मात्र त्या सीसीटीव्हीत वाहनांचे नंबर दिसले नाहीत. ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांनी या मार्गावरील सर्व पोलीस ठाण्यात ही खबर दिली. दरम्यान ठाणे येथील शहापूर पोलिसांनी हा संशीयत डंपर पकडला असून चालकाची चौकशी सुरु आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूWomenमहिलाJunnarजुन्नर