इंदापुरात तीन वाहनांचा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 23:57 IST2018-09-30T23:57:22+5:302018-09-30T23:57:35+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशाही बस (एमएच ०६, बी डब्ल्यू ०६४२) ही बस तुळजापूरहून पुण्याकडे जात असताना इंदापूर शहरातील पुणे-सोलापूर महामार्गावरील भरणेमामा

इंदापुरात तीन वाहनांचा अपघात
इंदापूर : इंदापूर येथील जुना पुणे-सोलापूर महामार्गावरील भरणे पेट्रोल पंपासमोर शिवशाही बस, महिंद्रा पिकअप व एशियाड एसटी बसचा विचित्र अपघात होऊन यामध्ये महिंद्रा पिकअप वाहन दोन एसटीगाड्यांमध्ये सापडल्याने पिकअप वाहनाचे नुकसान झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशाही बस (एमएच ०६, बी डब्ल्यू ०६४२) ही बस तुळजापूरहून पुण्याकडे जात असताना इंदापूर शहरातील पुणे-सोलापूर महामार्गावरील भरणेमामा पेट्रोल पंपासमोर आली असता अचानक ब्रेक दाबल्याने शिवशाही गाडी जागेवरच उभी राहिली. त्याचवेळी पाठीमागून सोलापूरकडून राशिनकडे जात असलेले पिकअप (एमएच १६, सीसी ००५२) शिवशाहीला पाठीमागून जाऊन धडकली. तर पिकअपच्या पाठीमागून लातूरहून पुण्याला जाणारी एशियाड बस (एमएच २०, ३७९०) चालकाला न आवरल्याने बस पिकअप गाडीला पाठीमागून जोरात धडकली. यामुळे त्यामुळे दोन एसटी बसगाड्यांच्या मध्येच महिंद्रा पिकअप दाबली गेल्याने मोठे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही.