शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
3
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
4
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
5
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
6
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
7
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
8
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
9
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
10
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
11
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
12
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
13
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
14
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

स्वच्छ शहरांमध्ये पुणे महापालिकेला 'थ्री स्टार' प्रमाणपत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 2:11 PM

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पुणे शहराचे मानांकन घसरले होते..

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण : स्पर्धेत नंबर घसरल्याने पालिकेने केले होते अपील

पुणे : केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पुणे शहराचे मानांकन घसरलेल्या महापालिकेला दिलासा मिळाला असून स्वच्छ शहरांच्या यादीत पुण्याला 'थ्री स्टार' मानांकन मिळाले आहे. केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास खात्याचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. या मानांकनामुळे पालिकेला ऐन कोरोना काळात आनंददायी बातमी मिळाली आहे. 

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये महापालिकेचे मानांकन घसरून ते थेट ३७ व्या स्थानी गेले होते. पालिकेने या सर्वेक्षणासाठी शहरातील भिंती रंगविण्यापासून अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मोबाईल रिंगटोन बदलण्यापर्यंत सर्व गोष्टी केल्या होत्या. सार्वजनिक स्वच्छतेसोबतच जनजगरुती, लोक प्रबोधन यावरही भर दिला होता. स्वच्छ सर्वेक्षणासाठी कोट्यावधीचा खर्च करण्यात आला होता. सल्लागाराची नेमणुकही करण्यात आली होती. सफाई कर्मचारी, घंटागाड्या, कचरा वाहनाऱ्या गाड्या, कचऱ्याचे व्यवस्थापन यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते. या स्पर्धेत १ लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आल्या ४२५ शहरांनी भाग घेतला. परंतु, केंद्रीय पथकाने केलेल्या पाहणीत पालिकेला कमी गुण मिळाले होते. शहराचे मानांकन ३७ वर घसरले होते. यावरून विरोधी पक्षांनी मुख्यसभेमध्ये प्रशासन आणि सत्ताधारी यांना धारेवर धरले होते. महापालिकेने केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास विभागाला पत्र पाठवीत सर्वेक्षणात त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. तसेच विश्लेषणात चुका झाल्याची शक्यताही वर्तविली होती. देशभरातून अशा ३८ पेक्षा अधिक शहरांनी अशाच स्वरूपाची पत्र पाठवीत सर्वेक्षणातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यावर केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास विभागाने पत्र पाठविलेल्या सर्व शहराच्या सर्वेक्षणाचा आढावा घेतला. तसेच त्याची पडताळणी केली. यामध्ये पालिकेला 'थ्री स्टार' रेटिंग मिळाले आहे. -------------सर्वेक्षणातील महत्वाचे मुद्दे१. शहरातील स्वच्छता२. ओढे - नाले स्वच्छता३. सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता४. निवासी-व्यवसायिक संकुलांची स्वच्छता५. झोपडपट्टयांमधील स्वच्छता

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMayorमहापौरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान