ब्राऊन शुगर विकणारे तिघे अटकेत

By Admin | Updated: May 23, 2014 04:55 IST2014-05-23T04:55:22+5:302014-05-23T04:55:22+5:30

ब्राऊन शुगर पावडरची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना भोसरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पावणेआठ लाख रुपये किमतीची ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे.

Three sellers of brown sugar have been arrested | ब्राऊन शुगर विकणारे तिघे अटकेत

ब्राऊन शुगर विकणारे तिघे अटकेत

पिंपरी : ब्राऊन शुगर पावडरची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना भोसरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पावणेआठ लाख रुपये किमतीची ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे. अटक आरोपींमध्ये भारतीय सैन्य दलातील जवानाचा समावेश आहे. ही कारवाई भोसरीतील एमआयडीसी चौकात बुधवारी रात्री दहाच्या सुमारास करण्यात आली. संदीप रघुनाथ कोल्हे (वय २६, रा. रायपूर, ता. महाड, जि. नाशिक), सौरभ संजय वाळुंज (वय २२, रा. गुजरआळी, जुनी पेठ, ता. महाड, जि. रायगड), दीपक रत्नाकर गायकवाड (वय २३, रा. ग्रामपंचायतजवळ, चांभारखिंड, ता. महाड, जि. रायगड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसी चौकाजवळ सफेद रंगाच्या मोटारीतून काहीजण ब्राऊन शुगरची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती हवालदार पंडित तापकीर यांना मिळाली होती. त्यानुसार, एमआयडीसी चौकात रात्री सव्वा आठला सापळा रचण्यात आला. पोलिसांनी तिघांनाही मोटारीसह पकडून मोटारीची डिकी तपासली. डिकीमधील कापडी पिशवी तपासली असता, त्यामधील प्लॅस्टिकच्या पिशवीत ब्राऊन शुगर आढळली. ७ लाख ६३ हजार रुपये किमतीची ३२६ ग्रॅम वजनाची ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली. भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली आहे. अटक आरोपींमधील संदीप रघुनाथ कोल्हे हा भारतीय सैन्य दलातील जवान आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Three sellers of brown sugar have been arrested