तीन सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:14 IST2021-08-23T04:14:50+5:302021-08-23T04:14:50+5:30
लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव भारत शिरसाठ (वय २०, रा. लोणी ...

तीन सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार
लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव भारत शिरसाठ (वय २०, रा. लोणी स्टेशन, आंग्रेवस्ती, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर), अभिजित अभिमन्यू आहेरकर (२०, रा, लोणी काळभोर) व सौरभ गोविंद इंगळे (वय २१, रा. इराणीवस्ती, लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) या तिघांना दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार प्रणव शिरसाठ हा त्याचे साथीदार अभिजित आहेरकर व सौरभ इंगळे यांची टोळी बनवून वारंवार गुन्हे करीत आहे. ते लोणी काळभोर गाव व परिसरात आपल्या साथीदारांसह कोयता, कुऱ्हाड व इतर घातक शस्त्रे जवळ बाळगुन सभ्य नागरिक, व्यापारी व इतर सर्वसामान्य लोक यांना घातक शस्त्रांचा धाक दाखवून अगर वेळप्रसंगी मारहाण करून, त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे लुबाडतात. ते सतत एकत्रित बेकायदेशीर कृत्ये करीत असतात. त्यांची लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, लोणी स्टेशन परिसर म्हणजेच लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरदस्त दहशत निर्माण झाली आहे. त्यांचेविरुध्द नागरिक तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत.
राजेन्द्र मोकाशी यांनी या टोळीचा तडीपारीचा प्रस्ताव तयार करून पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी सदरच्या प्रस्तावाची पडताळणी करून दि. २१ ऑगस्ट रोजी प्रणव भारत शिरसाठ याच्या टोळीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ प्रमाणे पुणे शहर व पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्याचा आदेश पारित केला आहे. सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त कल्याणराव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी, पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) सुभाष काळे, उपनिरीक्षक अमित गोरे, हवालदार गणेश सातपुते, संदीप धनवटे, गणेश भापकर, मल्हार ढमढेरे यांनी केली.