शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

घरकुल योजनेचे तीनच प्रस्ताव, दीनदयाळ उपाध्याय योजना राहिली कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 2:39 AM

केंद्र तसेच राज्य सरकारच्या घरकुल योजनेसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसाह्य योजना सुरू करण्यात आली. मात्र जागा खरेदी करण्यासाठी पुरंदर तालुक्यातील तीन गावातील केवळ तीन लाभार्थ्यांचे प्रस्ताव पंचायत समितीला पाठविण्यात आले असून त्यावर कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे उपाध्याय योजना कागदावरच राहिल्याचे पाहायला मिळत आहे.

नीरा  - केंद्र तसेच राज्य सरकारच्या घरकुल योजनेसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसाह्य योजना सुरू करण्यात आली. मात्र जागा खरेदी करण्यासाठी पुरंदर तालुक्यातील तीन गावातील केवळ तीन लाभार्थ्यांचे प्रस्ताव पंचायत समितीला पाठविण्यात आले असून त्यावर कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे उपाध्याय योजना कागदावरच राहिल्याचे पाहायला मिळत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अक्षय निगडे यांना माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.घरकुल बांधून मिळण्यासाठी उपाध्याय योजनेच्या अंतर्गत स्वमालकीची जमीन नसलेल्या लाभार्थ्यांना इतरत्र जमीन खरेदी करण्यासाठी ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याची तजवीज करण्यात आली होती. तालुक्यात जमिनीअभावी अनेक घरकुलांची कामे रखडली आहेत. परंतु अंमलबजावणी करणाºया यंत्रणांचे दुर्लक्ष झाल्याने आतापर्यंत केवळ तीनच प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठविण्यात आले आहेत. वास्तविक त्यानंतर ग्रामविकास विभागाने वेळोवेळी उपाध्याय योजनेत अमुलाग्र बदल केले होते. सरकारी जागाही घरकुल योजनेसाठी देता येणार होती. दोन किंवा अधिक लाभार्थ्यांनी मिळून एकत्र येत दुमजली किंवा तीमजली घरकुल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १४ जुलै २०१७ च्या शासन आदेशानुसार सरकारी जागावाटप करण्याबाबत गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु यावर काहीही कार्यवाही झाली नाही.निगडे यांनी माहिती अधिकार अर्जात गटविकास अधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील समितीने जागा वाटप करण्याबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती मागितली होती. यात स्थापन केलेल्या समितीची माहितीची स्वतंत्र प्रत न देता मूळ पत्रात समितीची माहिती दिली आहे. त्यामुळे माहिती अधिकार अर्जाच्या दणक्याने समिती स्थापन करण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी जीपीएल यादीत नावे असणाºया परंतु आॅनलाईन प्रणालीत त्रुटी राहिलेल्या लाभार्थ्यांचे अर्ज पुन्हा आॅनलाईन प्रणालीत भरून घेण्यात आले. यात काही लाभार्थ्यांचे कागदपत्रे पुन्हा देवूनही आॅनलाईन नोंदणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा लाभार्थ्यांची पुन्हा आॅनलाईन नोंदणी होणे गरजेचे आहे.दरम्यान, सर्वांसाठी घर या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारी जागांवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचे धोरण ग्रामविकास विभागाने आखले आहे. या धोरणाप्रमाणे उपविभागीय अधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील समिती अतिक्रमण नियमित किंवा पुनर्वसन करण्याबाबत निर्णय घेणार आहे. नुकताच महसूल अधिनियमातील कलम ४२ मध्ये बदल करण्यात आला आहे.जागा वाटपाचा निर्णय घेण्याबाबत यापूर्वीच समितीची स्थापना करून निर्णय घेणे गरजेचे होते. आॅनलाईन नोंदणीत गरजू लाभार्थी दूर राहत आहेत. पंचायत समितीकडून घरकुल देताना प्राधान्यक्रमानेचलाभ देण्यात यावा.- अक्षय निगडे, माहिती अधिकार कार्यकर्ते, गुळूंचेजमिनीचा अकृषिक वापर करण्यासाठी एनएची अट शिथिल करत नवीन कार्यपद्धती अंमलात आणली आहे. त्यामुळे घरकुल योजनेची अंमलबजावणी करण्यास तुकडाबंदी कायद्यामुळे येणारे अडथळे दूर होणार आहेत. घरकुल योजनेच्या बाबतीत यापूर्वीच्या धोरणाची अंमलबजावणी प्रभावी झाली नसल्याने योजनेला घरघर लागली आहे.

टॅग्स :HomeघरPuneपुणे