शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

दरोडेखोरांच्या मारहाणीत ३ पोलीस जखमी

By admin | Updated: March 18, 2015 22:55 IST

मलठण (ता. दौंड) येथील रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या मुंबई-सोलापूर या मिनी सिद्धेश्वर एक्स्प्रेसवरील सशस्त्र दरोडा पोलिसांच्या सतर्कतेमुळे अयशस्वी झाला.

दौंड : मलठण (ता. दौंड) येथील रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या मुंबई-सोलापूर या मिनी सिद्धेश्वर एक्स्प्रेसवरील सशस्त्र दरोडा पोलिसांच्या सतर्कतेमुळे अयशस्वी झाला. दरम्यान, दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात ३ पोलीस जखमी झाले आहेत. या वेळी १० ते १२ दरोडेखोरांनी रेल्वेवर तुफान दगडफेक केल्याने प्रवासी हतबल झाले होते. ही घटना पहाटे सव्वातीनच्या सुमारास घडली़जखमी पोलिसांनी जिवावर उदार होऊन बाबू सुखदेव काळे (रा. राजेगाव, ता. दौंड) या दरोडेखोराला जेरबंद केले, तर उर्वरित १० ते १२ दरोडेखोर पळून गेले आहे. स्वप्निल शिंदे, संजय पाचपुते, योगेश जगताप हे तीन पोलीस जखमी झाले असून, त्यांच्यावर पिरॅमिड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मुंबई-सोलापूर मिनी सिद्धेश्वर एक्स्प्रेसने बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास दौंड रेल्वे स्थानक सोडले़ सुमारे १५ मिनिटांतच ती मलठण स्थानकात पोहोचली़ या रेल्वे स्थानकावर तिघेही पोलीस बंदोबस्तावर होते़ या वेळी प्लॅटफॉर्मवर स्वप्निल शिंदे हे पोलीस, तर रेल्वे लाईनच्या दुसऱ्या लाईनला संजय पाचपुते, योगेश जगताप पहारा देत होते. तेवढ्यात १0 ते १२ सशस्त्र दरोडेखोर आले. त्यांनी गाडीवर तुफान दगडफेक केली. या वेळी स्वप्निलशिंदे यांनी बाबू काळे या दरोडेखोराला पकडले. हे पाहून त्याच्या साथीदारांनी आपला मोर्चा शिंदे यांच्याकडे वळविला़ त्यांनी चाकूने शिंदे यांच्या हातावर आणि बोटावर तीन वार केले. तरीदेखील मोठ्या हिमतीने शिंदे यांनी त्या दरोडेखोराला पकडून ठेवले. त्यानंतर उर्वरित २ पोलिसांच्या दिशेने दरोडेखोरांनी दगडफेक केली. या दगडफेकीत संजय पाचपुते, योगेश जगताप हे दोघे जखमी झाले. त्यांच्या पाठीवर, पोटावर दगड लागल्याने ते जखमी झाले़ असे असतानाही तिघांनीही जखमी अवस्थेत दरोडेखोराला पकडून स्टेशनमास्तरच्या केबिनमध्ये आणले. साथीदाराला केबिनमध्ये घेऊन गेल्याचे पाहिल्यावर अन्य दरोडेखोर दगडफेक करीत पळून गेले़ पोलिसांनी या घटनेची माहिती आपल्या वरिष्ठांना कळविली़ दौंडहून अधिक कुमक आल्यावर अधिक तपासासाठी त्याला दौंड रेल्वे पोलीस ठाण्यात आणले. घटनास्थळी रेल्वेचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तायत्र सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक वसंत शेटे यांनी पाहणी करून मध्यरात्रीच्या सुमारास जखमी पोलीसांना दौंड येथे आणले. याप्रकरणी मिनी सिद्धेश्वर एक्स्प्रेसवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)४दौंड रेल्वे पोलीस स्वप्निल शिंदे, संजय पाचपुते, योगेश जगताप या तिघांच्या सतर्कतेमुळे मिनी सिद्धेश्वर एक्स्प्रेसवरील दरोडा अयशस्वी झाला; अन्यथा दरोडेखोरांनी रेल्वेत हैदोस घातला असता. कारण, मलठण रेल्वे स्थानक हे निर्जन परिसरात असून, त्या परिसरात दिवसादेखील भीतीचे वातावरण असते. वरील तिन्ही पोलिसांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. अकारण थांबविल्या जातात गाड्यामलठणला गाडीला थांबा नाही़ दौंड ते भिगवण दुहेरी मार्ग असतानाही रात्रीच्या वेळी वाटेत गाड्या थांबविल्या जाऊ नयेत, अशा सूचना रेल्वेला देण्यात आल्या आहेत़ तरीही, वाटेत गाड्या थांबविल्या जातात़ रेल्वेगाड्यांच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलाची आहे़ तरीही सामाजिक कर्तव्य म्हणून रात्रीच्या वेळी रेल्वे स्थानकावर बंदोबस्त ठेवला जातो़ दरोड्याचे प्रकार घडत असल्याने वाटेत गाड्या थांबवू नयेत, अशा आमच्या सूचना आहेत़ - वसंत शेटे, पोलीस उपनिरीक्षक