शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा अटक निदर्शनास आणून देत तिघांची जामिनावर सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 19:18 IST

लोकांकडून साडेतीन लाख रुपये उकळल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी केलेली अटक बेकायदा असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.

पुणे : अनंत माथाडी ट्रान्सपोर्ट या संघटनेच्या नावाने लोकांकडून साडेतीन लाख रुपये उकळल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी केलेली अटक बेकायदा असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तिघांची जामिनावर सुटका करण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. मुजूमदार यांच्या कोटार्ने हा आदेश दिला.राहुल हरिभाऊ येवले (वय २८), अशोक मारूती येवले (४० दोघे रा. पाचाणे, चांदखेड, ता. मावळ), ज्ञानेश्वर अर्जुन केदार (४२ रा. भिकोजी मोरे नगर, उत्तमनगर, वारजे माळवाडी) या तिघांची जामीनावर सुटका करण्यात आली.  याप्रकरणी, रविंद्र रामचंद्र शेतसंघी (३० रा. रुपीनगर, तळवडे) यांनी हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती. आरोपी मनोज ऊर्फ मनोहर कुंडलिक येवले व त्याचा भाऊ राहुल येवले व इतर दोघांनी माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन मु. पो.  माण, ता. मुळशी, पुणे या नावाने बनावट पावती पुस्तक तयार केले. फियार्दीकडून बळजबरीने अनंत माथाडी ट्रान्सपोर्ट या संघटनेच्या नावाने पैसे घेऊन फसवणूक केली. अशा प्रकारे इतर लोकांकडून आतापर्यंत तीन लाख ५० हजार रुपए एक ते दीड वर्षांच्या कालावधीत घेतले, अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.  याप्रकरणी आरोपींना अटक करून कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांच्या पोलिस कोठडीला बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड . डॉ. चिन्मय भोसले यांनी विरोध केला. फौजदारी प्रक्रिया दंड संहिता (सीआरपीसी) कलम ४१ अ नुसार आरोपींना अटक करण्यापूर्वी नोटीस बजावणे आवश्यक होते. ज्या प्रकरणांमध्ये सात वर्षांपर्यंत शिक्षा होते, अशा सर्व प्रकरणांमध्ये पोलिस थेट आरोपींना अटक करू शकत नाही. अशा प्रकारे जर कारवाई करण्यात आलेली असेल तर संबंधितांची खात्याअंतर्गत चौकशी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने बंधनकारक केले आहे, असा युक्तीवाद अ‍ॅड. डॉ. चिन्मय भोसले यांनी कोर्टात केला.  

टॅग्स :PuneपुणेhinjawadiहिंजवडीPoliceपोलिसCourtन्यायालयArrestअटक