शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मासे आणण्याचा अट्टहास बेतलं जीवावर ; माणिकडोह धरणात होडी उलटल्याने तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 21:04 IST

होडी धरणाच्या मध्यभागी गेल्यावर अचानक उलटली...

ठळक मुद्देकेवाडी येथील दुर्घटना : मासे आणण्याचा अट्टहास बेतला जीवावर एनडीआरएफच्या पथकाने काढले मृतदेह बाहेर

जुन्नर :  तालुक्याच्या तालुक्याच्या आदिवासी भागातील केवाडी गावाच्या पिछाडीला असलेल्या माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मच्छीमारांकडुन मासे आणण्यासाठी होडीत बसुन गेलेल्या तीन तरूण होडी उलटल्याची घटना शुक्रवारी (दि २४) सकाळी घडली. घटनास्थळी एनडीआरएफचे पथक दाखल झाले असून दुपारी तीनही तरूणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.  गणेश भाऊ साबळे (वय २२, रा. निमगिरी), स्वप्नील बाळू साबळे (वय २२,  रा. निमगिरी),  पंढरीनाथ मारुती मुंढे (वय २५, रा. पेठेची वाडी) अशी बुडालेल्या तरूणांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी साडेसातच्या वेळेस हे तीन तरूण मासे आणण्यासाठी मच्छीमारांच्या होडीत (मच्छीमारांचा तराफा) धरणात गेले.  यावेळी होडीत आठ जण होते. होडी धरणाच्या मध्यभागी गेल्यावर अचानक उलटली. यावेळी आठही जण पाण्यात  गटांगळ्या खाऊ लागले. यातील ५ जणांनी बाहेर पोहत येऊन आपले प्राण वाचविले. तर तीन तरुण मात्र पाण्यात बुडाले होते. स्थानिकांनी जुन्नर पोलिसांना याची माहिती दिल्यावर जुन्नर पोलीस तसेच ग्रामस्थांनी बेपत्ता तरुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांना यश मिळाले नाही. यामुळे एन.डी.आर.एफ च्या पथकाला पाचारण करण्यात आले. दोन बोटी आणि आठ जवानांनी बेपत्ता तरूणांचा शोध घेऊन त्यांचे मृतदेह दुपारनंतर पाण्यातुन शोधून  बाहेर  काढले.  पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार परप्रांतीय मच्छीमार  पाण्याच्या पलीकडे होते. या तरुणांनी मासे  घेण्यासठी   पलीकडे  जाण्याचे ठरवले. मच्छीमारांनी या तरुणांना पाणी ओलांडुन येवू नका आम्ही तुमच्याकडे येतो असे सांगितले. तरुणांना  होडीत बसण्यास रोखले होते. परंतु त्यांनी  बळजबरीने होडीत बसण्याचा  केलेला अट्टाहास त्यांच्या अंगाशी आला. काही अंतरावर गेल्यानंतर होडी  उलटल्याने  होडीत असणारे ऐकून ८ ग्रामस्थ पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले.   ५ जणांनी बाहेर पोहत येऊन आपले प्राण वाचविले तर गणेश भाऊ साबळे, स्वप्नील बाळू साबळे,   पंढरीनाथ मारुती मुंढे यांचा बुडून मृत्यू झाला.  यातील मुंढे हा विवाहित होता तर इतर दोघे जण अविवाहित होते.  होडी  चालविणारा परप्रांतीय मच्छीमाराला देखील पोहता येत नव्हते तो  देखील गटांगळ्या खाऊ लागल्याने त्याला काठावरील मच्छीमारांनी वाचविले. तर गटांगळ्या खाणा-या या तरुणांनी वाचण्यासाठी एकमेकांना मिठ्या मारल्याने काठापासून अवघ्या १० फुट अंतरावर १२ फुट खोलीच्या पाण्यात हे तरुण बुडाले. 

टॅग्स :Junnarजुन्नरDeathमृत्यूDamधरण