पुणे : पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याच्या दिवसापासून (9 मार्च ते 14 मे) या तब्बल 61 दिवसांमध्ये कोरोनापासून सुरक्षित राहिलेल्या 'जनता वसाहत' झोपडपट्टीतील तीन रहिवासी बाधित झाले आहेत. वास्तविक यातील दोन रुग्ण हे अनेक दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. सुदैवाने या तीनही रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील (क्लोज कॉन्टॅक्ट) सर्वजण निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जनता वसाहतीच्या 'नो कोरोना पॅटर्न'ला काही प्रमाणात तडा गेला असला तरी त्याला नियंत्रित करण्याकरिता प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. शहरातील जनता वसाहत ही सर्वात मोठी झोपडपट्टी आहे.
'61 दिवस' सुरक्षित राहणाऱ्या पुण्यातील जनता वसाहतीत कोरोनाचा शिरकाव,तीन नागरिकांना संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 18:31 IST
'नो कोरोना पॅटर्न'ला काही प्रमाणात तडा गेला असला तरी नियंत्रित करण्याकरिता प्रयत्न सुरु
'61 दिवस' सुरक्षित राहणाऱ्या पुण्यातील जनता वसाहतीत कोरोनाचा शिरकाव,तीन नागरिकांना संसर्ग
ठळक मुद्देसुदैवाने क्लोज कॉन्टॅक्ट मधील सर्व निगेटिव्ह शहरातील जनता वसाहत ही सर्वात मोठी झोपडपट्टी