शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मिलिंद एकबोटेंवर शाई फेकल्याप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 20:44 IST

न्यायालयाच्या परिसरात वकीलाच्या वेशात असलेल्या संजय वाघमारे याने मिलिंद एकबोटेंवर शाई फेक केली.

ठळक मुद्देसंजय वाघमारे हा गनिमीकावा प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष आहे.

पुणे : समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे यांच्यावर शाई फेकल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केले असता त्यांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी सचिन आगरकर यांनी २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.    संजय हरिदास वाघमारे (वय ३१, रा. अप्पर बिबवेवाडी), विठ्ठल अशोक खाडे (वय २३, रा. मांगडेवाडी, कात्रज) आणि अवदेश श्रीलालजी यादव (वय २७, अप्पर इंदिरानगर) अशी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सोमवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास मिलिंद एकबोटे यांना कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. कोठडी सुनावल्यानंतर त्यांना घेवून जात असताना न्यायालयाच्या बाहेर पडताच वकीलाच्या वेशात असलेल्या संजय वाघमारे याने एकबोटेंवर शाई फेक केली. तसेच पोलिसांना धक्काबुक्की करून त्याने सरकारी कामात आणला, अशी फिर्याद देण्यात आली आहे. एकबोटे यांच्यावर शाई झाल्यानंतर कोर्टात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारानंतर समस्त हिंदू आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कोर्टात येऊन घोषणबाजी केली. तसेच, शाईफेक करणा-याला ताब्यात देण्याची मागणी केली.     वाघमारे हा गनिमीकावा प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष असून इतर दोघे या संघटनेचे कार्यकर्ते आहेत. त्यांचे आणखी कोणी साथीदार याप्रकरणात समाविष्ट आहेत का ?तसेच संजय हा सराईत वृत्तीचा असून त्याच्यावर यापूवीर्ही गुन्हे दाखल आहे. त्याला हा गुन्हा करण्यासाठी कुठल्या संघटनांनी सांगितले का ? याचा तपास करण्यासाठी सरकारी वकील संजय दिक्षीत यांनी तिघांच्याही पोलीस कोठडीची मागणी केली. याला बचावपक्षाच्या वतीने आलूर असोसिएटचे वकील रणजीत ढोमसे-पाटील आणि अ‍ॅड. अकुंश जाधव यांनी विरोध केला. तिघांनाही न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र , न्यायालयाने तिघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाCourtन्यायालयMilind Ekboteमिलिंद एकबोटेPoliceपोलिस