लोकमत न्यूज नेटवर्क, भिगवण: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील डाळज नंबर २ (ता. इंदापूर) येथे गुरुवारी (दि,२६) रोजी सायंकाळच्या सुमारास पुणे लेनवर रस्त्याच्या कडेला पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या टेम्पोला पाठीमागून इको चारचाकी गाडीची जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला यामध्ये दोन महिला आणि एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले आहेत.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा
या अपघातात आदिती अमर हातेकर (वय २५) व त्यांच्या मुलगा जय अमर हातेकर (वय २) आणि सखुबाई ईश्वर गेजगे (वय ६०, सर्व राहणार सांगोला, जिल्हा सोलापूर) हे अपघातात जागीच ठार झाले. तर इको गाडीवरील चालक कबीरदास ईश्वर गेजगे (वय ५०, रा. पाटस ता. दौंड) हे गंभीर जखमी झालेले आहेत. तर त्यांच्या पत्नी स्वाती कबीरदास गेजगे (वय ३४) व मुलगी समृद्धी कबीरदास गेजगे (वय १०) हे किरकोळ जखमी झाले असून गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली.
हा अपघात आयशर टेम्पो (एमएच १३ सीयू ५१६३) याचा टायर पंचर झाल्याने धोकादायक स्थितीत अर्धवट हायवे रोडच्या साईडला उभा होता. पाठीमागून येणारी मारुती सुझुकी कंपनीची इको गाडी नंबर (एम एच १२ एक्स ई ८८१६) यावरील चालकाने आयशर टेम्पोला पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला आहे.
Web Summary : A tragic accident on the Pune-Solapur highway claimed three lives, including a mother, child, and elderly woman, after a car collided with a stationary truck. Three others sustained injuries. The incident occurred near Dalaj, Indapur, and is under police investigation.
Web Summary : पुणे-सोलापुर राजमार्ग पर एक दुखद दुर्घटना में एक कार के खड़े ट्रक से टकरा जाने से एक माँ, बच्चे और बुजुर्ग महिला सहित तीन लोगों की जान चली गई। तीन अन्य घायल हो गए। घटना डाळज, इंदापूर के पास हुई, पुलिस जांच जारी है।