शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

लॉकडाऊनचा असाही घाला! भारती विद्यापीठ परिसरात नैराश्यातून एकाच दिवशी तिघांच्या आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 22:07 IST

भारती विद्यापीठ परिसरात आज एकाच दिवशी तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

धनकवडी : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने शासनाने महिन्यांहून अधिक काळ लॉकडाऊन जाहीर केल्याने हजारोंचा रोजगार हिरावला गेला आहे. त्याचे दुष्परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. भारती विद्यापीठ परिसरात आज एकाच दिवशी तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

निरंजन बाळकृष्ण साळुंखे (वय ३५, रा. वर्धापन बिल्डिंग, वंडरसिटीजवळ) या तरुणाने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. निरंजन हा वाहन चालक होता. गेल्या महिन्यांपासून तो बेरोजगार होता. त्याचा मित्र निरंजन याला दररोज जेवणाचा डबा आणून देत असे. तो मित्र शनिवारी रविवारी आला नव्हता. सोमवारी दुपारी डबा घेऊन आला तेव्हा निरंजनने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. 

पोपट पांडुरंग सलगर (वय ४०, रा. सुखसागरनगर) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.  पोपट याची दोन्ही मुले गावाला गेली आहेत. पत्नी कामाला बाहेर गेली होती. त्यामुळे तो एकटाच घरी होता. त्याचा मित्र सतत फोन करीत होता. मात्र, पोपट फोन उचलत नसल्याने मित्र घरी गेल्यावर त्याने आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

राजीव गांधी उद्यानासमोर एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज उघड झाले. त्याच्याजवळ कोणतीही चिठ्ठी, मोबाईल अथवा ओळख पटले, असे कोणतीही वस्तू नव्हती, असे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी सांगितले. एकाच परिसरात तीन वेगवेगळ्या आत्महत्येच्या घटनांनी परिसरात एकच चर्चेचा विषय झाला आहे. ़़़़़़़़़मनाला उद्विग्न करणाऱ्या आत्महत्यांच्या घटनांचे स्वरूप दिवसेंदिवस उग्र होते आहे. प्रत्यक्ष आत्महत्येची कारणे अनेक असली तरी बहुतेक घटनांमध्ये संबंधित व्यक्तीची वैफल्यग्रस्त मानसिक अवस्था हा महत्त्वाचा समान धागा आढळतो. अशा पीडितांना संवादाचा अभाव जाणवतो, मदत वेळेवर मिळत नाही, कोणाकडे मदत मागावी हे कळत नाही, मदत मागण्याचा कमीपणाही वाटतो. समाजामध्ये आत्महत्या करण्याचं वाढतं प्रमाण चिंताजनक आहे. आत्यंतिक नैराश्याच्या पोटी केल्या जाणाऱ्या आत्महत्या प्रयत्नपूर्वक रोखायला हव्यात आणि त्यासाठी जाणीव पूर्वक प्रयत्न केला पाहिजे.ध्यानगुरु रघुनाथ येमुल गुरुजी.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूDhankawadiधनकवडीPoliceपोलिस