शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

आळेफाटा येथे पेट्रोलपंप लुटण्याच्या तयारीतील तीन जणांना हत्यारांसह अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 13:35 IST

पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पर जिल्ह्यातील टोळीतील तीन जणांना आळेफाटा पोलिसांनी अटक केली.

आळेफाटा :  पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पर जिल्ह्यातील टोळीतील तीन जणांना आळेफाटा पोलिसांनी नाकेबंदीदरम्यान मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास घातक हत्यारांसह जेरबंद करून अटक केली. या टोळीतील दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले.   दरोड्याच्या तयारीत असलेल्या शंकर जाधव, गजानन नरवडे व ज्ञानेश्वर चौधरी (सर्व रा. गंगापूर नाशिक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, त्यांच्यावर आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक बाजूने आळेफाटा परिसरात मोटार कार (एमएच- 0२ एनए. ४३१९) पहाटेच्या वेळी आल्याचे नाकेबंदीवरील आळेफाटा पोलिसांचे निदर्शनास आले. कारमधील काही जणांच्या संशयास्पद हालचाली पाहून पोलिसांनी कार बाजूस घेण्यास सांगितले असता कारमधील दोन जण उतरत पळून गेले. यानंतर पोलिसांनी आतील तीन जणांना पकडले. या तिघांची तसेच कारची झडती घेण्यात आली. त्या वेळी कटावणी,लोखंडी हुक, लाकडी दांडा असलेला हूुक, चाकू, कोयता, लोखंडी पाईप, स्क्रुड्रायवर, कटर, नायलॉन रस्सी, चिकटपट्टी बंडल, प्लॅस्टिक दांडा, दोन मिरची पुड, दोन मोबाईल ही हत्यारे त्यांच्याकडून मिळाली आहेत.पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, फौजदार राहुल गोंदे, पोलीस कर्मचारी महेश पठारे, नीलकंठ कारखिले, हरिश्चंद्र करे, जालिंदर रहाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींना जुन्नर न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली असल्याचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी सांगितले. .......दरम्यान, आरोपींकडील कार पोलिसांनी जप्त केली आहे.  कांचा व संतोष (पूर्ण नावे समजली नाहीत) हे दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले. अटक केलेल्या टोळीतील तिघा जणांनी आळेफाटा परिसरातील पेट्रोलपंप लुटायला आले असल्याची कबुली पोलिसांना दिली. 

टॅग्स :Junnarजुन्नरArrestअटकPoliceपोलिसtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी