शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डॉग प्रशिक्षकाचा तीन लाखांचा श्वान नेला चोरून; कात्रजमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 21:48 IST

हम आपके है कौन? च्या टफीला दिले होते प्रशिक्षण

ठळक मुद्देफिर्यादींचा श्वान प्रशिक्षणाचा व्यवसाय : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल गेली तीन दिवस झाले माझा कुत्रा उपाशी

पुणे : डॉग प्रशिक्षकाकडील २ लाख ८० हजार रुपयांचा लासपसो जातीचा कुत्रा चोरुन नेण्याचा प्रकार कात्रज परिसरात घडला असून भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. निरंजन आनंद कुलकर्णी (वय ३४, रा. रक्षलिका सोसायटी, धनकवडी) आणि अमोल मारुती चव्हाण (वय ३५, रा. अप्पर इंदिरानगर) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी सचिन मधुराज अ‍ॅन्थोनी (वय ३६, रा़ निंबाळकर वाडी, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, सचिन अ‍ॅन्थोनी हे डॉग ट्रेनर आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून ते डॉग ट्रेनिंगचे काम करीत आहेत. त्यांच्याकडे बऱ्याच जातीचे कुत्री असून ती त्यांनी पाळलेली आहेत. २८ जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता ते पत्नीसह कुत्र्यांना खाद्य आणायला गेले होतो. त्याकाळात त्यांच्या फॉर्म हाऊसवरील मोकळ्या जागेत लासपसो जातीचे कुत्र दिपानी हिलफायईर ऊर्फ लिओ हे २ लाख ८० हजार रुपयांचे कुत्र होता. तो दोन वर्षे चार महिन्यांचा असून त्यावेळी आलेले निरंजन आणि अमोल चव्हाण फार्म हाऊसवर आले. एकाने तेथील नागरिकांना बोलण्यात गुंतवून ठेवले तर दुसरा श्वान घेवून पसार झाला. पोलिस तपासात परिसरातील प्रत्यक्षदर्शींनी श्वान चोराची माहिती दिली. संशयीत निरंजन आणि अमोल या दोघांचाही श्वान ब्रिडिंगचा व्यवसाय आहे. अ‍ॅन्थोनी हे परत आल्यावर त्यांना हा प्रकार समजला़ त्यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़  सचिन अ‍ॅन्थोनी यांनी सांगितले की, गेली तीन दिवस झाले माझा कुत्रा उपाशी आहे. कारण तो माझ्याशिवाय खात नाही. नुकताच झालेल्या डॉग शोमध्ये त्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याच्या शरीरात अजून स्पर्धेकरीता मायक्रो चीप आहे. याबाबत निरंजन कुलकर्णी यांनी सांगितले की, आमचाही श्वान प्रशिक्षणाचा व्यवसाय असून सचिन जेथे आता ज्या फॉर्म हाऊसवर हा व्यवसाय करतात. तेथे आम्ही व्यवसाय करत होते. आमचेही कुत्रे अनेकदा पळून गेले होते. नंतर ते त्याच परिसरात सापडले़ आमच्यावर संशय घेतल्याने आम्ही दुसऱ्या दिवशी त्याचा शोध घेऊन मध्यस्थामार्फत त्यांना कुत्रा परत केला असल्याचा दावा कुलकर्णी यांनी केला आहे. मात्र, आपल्याला अद्याप कुत्रा परत मिळाला नसल्याचे सचिन अ‍ॅन्थोनी यांनी सांगितले. ़़़़़़़़़़़हम आपके है कौन? च्या टफीला दिले होते प्रशिक्षणश्वान मालक सचिन अँथोनी यांचे वडिल मधुराज अ‍ॅन्थोनी यांचा गेली ५० वर्षांपासून श्वान प्रशिक्षणाचा व्यवसाय आहे़ सलमान खान, माधुरी दीक्षित यांचा ‘हम आपके है कौंन’ मधील टफी या श्वानाची भूमिकाही तितकीच महत्वाची व लोकप्रिय झाली होती़ या टफी याला अ‍ॅन्थोनी यांनी प्रशिक्षण दिले होते़ 

टॅग्स :Dhankawadiधनकवडीdogकुत्राHum Aapke Hai Kaunहम आपके हैं कौनtheftचोरीPoliceपोलिस