तीन सदस्यीय प्रभागाचा बुधवारी फेरविचार- बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 06:14 PM2021-09-25T18:14:11+5:302021-09-25T18:31:11+5:30

काँग्रेस भवनमध्ये पत्रकारांबरोबर बोलताना थोरात म्हणाले, यावर चर्चा होणे स्वाभाविक आहे, तसेच काही मते वेगळी असणेही शक्य आहे...

three member ward reconsidered on wednesday balasaheb thorat | तीन सदस्यीय प्रभागाचा बुधवारी फेरविचार- बाळासाहेब थोरात

तीन सदस्यीय प्रभागाचा बुधवारी फेरविचार- बाळासाहेब थोरात

Next

पुणे: महापालिका निवडणूकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग हा मंत्रीमंडळाचा सामूहिक निर्णय आहे. पण त्यात मतमतांतरे असू शकतात, त्यामुळे येत्या बुधवारी मंत्री मंडळाच्या बैठकीत यावर फेरविचार होऊ शकतो असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी सांगितले.

काँग्रेस भवनमध्ये पत्रकारांबरोबर बोलताना थोरात म्हणाले, यावर चर्चा होणे स्वाभाविक आहे, तसेच काही मते वेगळी असणेही शक्य आहे. मंत्री मंडळात निर्णय झाला त्यावेळी एकमतानेच झाला. नंतर यावर झालेल्या चर्चेत काही जणांची मते वेगळी असल्याचे लक्षात आले. त्याचाही विचार व्हायला पाहिजे. त्यामुळे बुधवारी यावर फेरविचार होऊ शकतो. 

पिंपरीत स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी केला पर्दाफाश; एक जण अटक

वीज बिलांची थकबाकी ही वस्तस्थिती आहे. ती नाकारता येणार नाही. आम्ही त्यावर मार्ग काढणण्याचा प्रयत्न करतो आहोत. काहीही झाले तरी राज्य अंधारात जाऊ देणार नाही, त्यासाठी आम्ही सक्षम आहोत असे थोरात यांनी सांगितले.

 

Web Title: three member ward reconsidered on wednesday balasaheb thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app